किशोर वयाच्या सवयी

किशोर वयाच्या सवयी

नेटफ्लिक्सवर  चार भागाची लघुसीरियल चाललीय. ‘ॲडलसन्स’. पौगंडावस्था. किशोर वय. ही मालिका मार्चच्या शेवटल्या आठवड्यात पडद्यावर आली. कायच्या काय गाजतेय. ब्रिटीश खासदारांनी ती पाहिली. लोकसभेनंही ती जवळजवळ पाहिली. मंत्र्यांनी पाहिली आणि प्रधान मंत्र्याना आग्रह केला की ती पहावी. प्रधान मंत्री सध्या युक्रेनमधे गुंतलेत. ट्रंपनी नेटोमधून लक्ष काढलंय आणि युरोपीय देशांना वाऱ्यावर सोडलंय, तुमचं तुम्ही पहा अमेरिका तुम्हाला पैसे देणार नाही असं सांगितलंय. युरोपीय देशांची तंतरलीय. अशा गडबडीतही  प्रधान मंत्री स्टार्मरनी ती पाहिलीय. असं काय आहे त्या मालिकेत? जेमी मिलर या १३…

Read More Read More

ट्रंप पुतीन गुऱ्हाळाची निष्पत्ती?शून्य?

ट्रंप पुतीन गुऱ्हाळाची निष्पत्ती?शून्य?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून दोन तासांची चर्चा झाली. युक्रेनमधलं युद्ध एक महिन्यासाठी थांबवण्यासाठी ही चर्चा होती. यात युक्रेन कुठंही नव्हतं. युक्रेनला मदत करणाऱ्या युरोपियन देशांचा एकही प्रतिनिधी या चर्चेत नव्हता.  चर्चा सुरू त्या चोविस तासात युक्रेनचे ड्रोन रशियात बाँब टाकत होते आणि रशियाची विमानं युक्रेनवर बाँबफेक करत होती. पुतीन दिलेला शब्द पाळत नाहीत हे झेलेन्सकीना माहित होतं, तसं झेलेन्सकी वारंवार म्हणाले होते.   चर्चा झाल्यावर संयुक्त पत्रक निघालं नाही. पुतीननी रशियात स्वतंत्र प्रतिक्रिया…

Read More Read More

दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान

दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान

जाफर एक्सप्रेस दुर्घटनेनं पाकिस्तानमधलं वास्तव जगासमोर आणलं आहे. ११ मार्च रोजी सकाळी क्वेट्ट्याहून पेशावरकडं निघालेली जाफर एक्सप्रेस बलुचिस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशन (बलिऑ)या संघटनेनं रूळ उडवून अडवली. गाडीत ४०० प्रवासी होते. त्यात १२५ प्रवासी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे होते. दहशतवाद्यांची संख्या होती ३३. लष्करी कारवाईत सर्व दहशतवादी आणि २६ प्रवासी मारले गेले. दोन दिवस कारवाई चालली होती. बलुच संघटना पाकिस्तान सरकारशी भांडत असते, पाकिस्तानी सुरक्षा दलावर आणि पाकिस्तानी सरकारी आस्थापनांवर हल्ले करत असते. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानला सवतीसारखं वागवते; पाकिस्तान सरकार सर्व आर्थिक फायदे…

Read More Read More

ट्रंप यांच्या जिभेला हाड नाही, मेंदूत स्निग्धपणा नाही

ट्रंप यांच्या जिभेला हाड नाही, मेंदूत स्निग्धपणा नाही

ट्रंप यांनी केलेल्या घोषणांमुळं जग हादरणं स्वाभाविक आहे. ट्रंप यांच्या धोरणातले मुद्दे असे. १. इथून पुढे अमेरिका जगाची उस्तवारी करणार नाही. जगभर वाटली जाणारी मदत बंद केली जाईल. जागतीक आरोग्य संघटना असो की जग प्रदूषण मुक्त करण्याचा करार की युनायटेड नेशन्स; जगानं आपलं आपण पाहून घ्यावं, अमेरिका आता सर्वापासून दूर. २. नेटोमधे अमेरिका पैसे ओतत होती, युरोपात अमेरिकेचं सैन्य आणि शस्त्रं होती. आता अमेरिका नेटोच्या बाहेर पडेल. युक्रेनला दिली जाणारी मदत, शस्त्रं आणि सामरिक इंटेलिजन्स आता अमेरिका पुरवणार नाही. ३….

Read More Read More

अशा भीषण माणसाच्या हातात नागरीक देश सोपवतात.

अशा भीषण माणसाच्या हातात नागरीक देश सोपवतात.

डोनल्ड ट्रंप ही काय चीज आहे ते केवळ एका पत्रकार परिषदेत स्पष्टपणे कळलं. ब्रिटीश प्रधान मंत्री कीर स्टार्मर युक्रेन व इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनला गेले होते. ट्रंप यांच्या मंत्री मंडळाबरोबर चर्चा, जेवतांना चर्चा आणि नंतर ट्रंप यांच्याबरोबर चर्चा अशा तीन सत्रांमधे युक्रेन प्रश्न चर्चिला जाणार होता. त्यात काही एक धोरण ठरणार होतं. नंतर संयुक्त पत्रकार परिषदेत संयुक्त वक्तव्य जाहीर होणार होतं. वरील चर्चासत्रं सुरू व्हायच्या आधीच ट्रंप आणि स्टार्मर यांनी पत्रकार परिषद घेतली. १. दुसऱ्या दिवशी झेलेन्सकी अमेरिकेत ट्रंपना…

Read More Read More

सिनेमा/माहिती पट. बाळकृष्ण विठ्ठल दोशी

सिनेमा/माहिती पट. बाळकृष्ण विठ्ठल दोशी

बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांचं आर्किटेक्चर ❖ पारंपरीक नक्षीकाम नाही पण सूत्र हरवलेलं अत्याधुनिकही नाही असं आधुनिक आर्किटेक्चर दोशी यांनी केलं. ❖ मुंबईत आर्किटेक्ट लोकांनी एक चित्रपट जत्रा भरवली होती. त्यात आर्किटेक्चर या विषयाभोवती चित्रपट दाखवले गेले. चित्रपट म्हणजे माहितीपट होते. त्यातला एक माहितीपट होता बाळकृष्ण विठ्ठल दोशी यांच्यावर. दोशी २०२३ साली एक्याण्णवाव्या वर्षी वारले. दोशी पुण्यात जन्मले, अहमदाबादेत वाढले, मुंबई, लंडन आणि पॅरिसमधे शिकले, दिल्ली-बंगलोर-अहमदाबाद-इंदूरमधे त्यांनी वास्तू बांधल्या. माहितीपटात दोशी अहमदाबादच्या दाट वस्तीत फिरताना दिसतात. वय झालेलं असल्यानं एक मदतनीस…

Read More Read More

धर्म आणि राजकारण. मदरसे.

धर्म आणि राजकारण. मदरसे.

मदरशांचं रजिस्ट्रेशन आणि नियंत्रण करणारा कायदा पाकिस्तानात मंजूर झाला आहे. २०२३ मधेच संसदेनं तो मंजूर केला होता पण राष्ट्रपतीची सही झाली नव्हती. ती सही २०२४ च्या डिसेंबरमधे झाली. आधीपासून असलेल्या कायद्यात झालेल्या सुधारणेमुळं आता पाकिस्तानातल्या सर्व जुन्या मदरशांना आणि नव्यानं स्थापन होणाऱ्या मदरशांना नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणीनंतर मदरशात कोणते विषय शिकवले जातात, मदरशांना पैसे कुठून येतात याची नोंद सरकारकडं होईल.   ❖ पाकिस्तानातल्या मोठ्या शहरात जा. मोठ्या शहरातल्या गरीब विभागात जा. दाटीवाटीनं बांधलेल्या इमारतीमधून वाट काढत पुढं सरका. इमारतीतून…

Read More Read More

एमिलिया पेरेझ वादग्रस्त चित्रपट

एमिलिया पेरेझ वादग्रस्त चित्रपट

एमिलिया पेरेझ. ❖ एमिलिया पेरेझ या चित्रपटावर प्रेक्षक तुटून पडले. समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांपैकी अनेकांनी या चित्रपटाला एक स्टारही द्यायला नकार दिला. ऑस्करवाल्यांनी मात्र या चित्रपटाला १३ नामांकनं दिली आहेत. ❖ एमिलिया पेरेझ या सिनेमात नाट्य, थरार, रहस्य इत्यादी घटकांची रेलचेल आहे. एक ड्रग टोळीचा नायक आहे. त्याचं प्रचंड साम्राज्य आणि संपत्ती आहे. त्याच्या मनात येतं की आपण एक नवा अवतार घ्यावा आणि आपल्या पापांचं परिमार्जन करावं. लिंगपरिवर्तन आणि शरीर परिवर्तन करणाऱ्या डॉक्टरांकडं तो जातो. पुरुषाचा स्त्री होतो. दानशूर संत…

Read More Read More

गाझाची खरेदी रियल एस्टेटवाले ट्रंप करणार

गाझाची खरेदी रियल एस्टेटवाले ट्रंप करणार

 एका नव्या उत्पाताचं सूतोवाच अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांनी केलं आहे. ट्रंप यांना गाझाची मालकी हवीय. ती मिळवण्यासाठी प्रसंगी ते अमेरिकेचं सैन्यही गाझात पाठवायला तयार आहेत. आज घडीला ते फक्त बोललेत, त्यांनी आपला विचार अमलात आणायचा प्रयत्न केला तर मध्य पूर्वेत काय होईल? सारं जग उलथापालथीत सापडेल? ट्रंप पहिल्या खेपेला प्रेसिडेंट झाले होते तेव्हां म्हणाले होते की इराकमधे आणि अफगाणिस्तानमधे सैन्य घुसवणं ही अमेरिकेची चूक होती, आपण तो उद्योग पुन्हा करणार नाही. आता दुसऱ्या खेपेत ट्रंप  गाझढा या दुसऱ्या एका…

Read More Read More

पुस्तक: तालिबान कां प्रभावी ठरतं?

पुस्तक: तालिबान कां प्रभावी ठरतं?

पुस्तक : RADIO FREE AFGHANISTAN लेखक : Saad Mohseni ❖ अफगाणिस्तान हे जगाला पडलेलं एक कोडंच आहे. तिथं काय चालतं ते कळत नाही. समजा ते कळलं तर ते तसं कां चाललंय ते कळत नाही. कारण अफगाणिस्तानबद्दल फारशी माहिती माध्यमांत येत नाही. ही अडचण पुस्तकं दूर करतात. साद मोहसेनी रेडियो फ्री अफगाणिस्तान या पुस्तकामुळं अफगाणिस्तान हे कोडं समजायला मदत होते. ❖ तालिबान कां पुसलं जात नाही.  ❖ अफगाणांना बाहेरच्या लोकांचं वर्चस्व सहन होत नाही. एकोणिसाव्या शतकात ब्रिटीशांनी अनेक लढाया केल्या, हरले,…

Read More Read More