सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे/झोन ऑफ इंटरेस्ट झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला २०२४ च्या ऑस्कर स्पर्धेत उत्कृष्ट चित्रपट (परदेशी) आणि ध्वनी या दोन वर्गात बक्षिसं मिळाली. हा चित्रपट मुंबईत मामी महोत्सवात दिसला होता. ‘झोन’ ही हिटलरच्या छळछावणीची गोष्ट आहे. ऑशविझ या पोलंडमधल्या छावणीत हिटलरनं लाखो ज्यू जाळून मारले. छावणीचा प्रमुख रुडॉल्फ हस छावणीच्या कंपाऊंड भिंतीला लागून असलेल्या घरात रहात असे. रुडॉल्फ हस, त्याची पत्नी हेडविग, त्यांची पाच मुलं. कुटुंब अत्यंत सुखात आणि आनंदात रहात होतं. माणसं जाळण्याचं  महान काम कार्यक्षमतेनं पार पाडल्याबद्दल हिटलरनं हसला…

Read More Read More

रविवार / पुतळे

रविवार / पुतळे

आपल्याला प्रिन्स फिलिप माहित आहेत. दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पती. ते १९७७ ते २०११ येवढा काळ केंब्रिज युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर होते. त्यांचा पुतळा केंब्रिज शहराच्या मोक्याच्या जागी बसवायचं पालिकेनं ठरवलं. तसा ठराव झाला, उरुग्वेतले एक शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांना कंत्राट दिलं. १.५० लाख पाऊंड मेहेनताना देण्यात आला.  २०१४ साली पुतळा केंब्रिजमधे पोचला तेव्हां  केंब्रीज पालिकेच्या कला विभागाचा अधिकारी नाराज झाला. त्यानं नोंद केली की  पुतळ्याचा दर्जा चांगला नाहीये, पुतळा लोकांसमोर येणं मला योग्य वाटत नाही. ब्रीटन म्हटलं की चर्चा आलीच. पालिकेत…

Read More Read More

पुस्तकं. पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की!

पुस्तकं. पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की!

Bibliophobia The End and the Beginning of the Book Brian Cummings. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (युके) मधे प्रोफेसर.  Oxfor University Press  ५९२ पानं. वजन  १ किलो १० ग्रॅम. ।। पुस्तकांची भीती/तिरस्कार हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे. माणूस पुस्तकांचा तिरस्कार करतो आणि पुस्तकावर प्रेमही करतो हे सांगता सांगता लेखक पुस्तक निर्मितीचा दीर्घ इतिहास या पुस्तकात चितारतो.  पुस्तक ही एक वस्तू असते तसंच ती एक कल्पनाही आहे असा लेखकाचा सिद्धांत आहे.   ॥  पुस्तकं सुरवातीला पानांवर, जनावरांच्या कातडीवर लिहिली गेली.  भूर्जापत्रावर मजकूर लिहायचा,…

Read More Read More

रविवार/ १४० रशियन कोणी मारले?

रविवार/ १४० रशियन कोणी मारले?

२२ मार्चच्या शुक्रवार. मॉस्कोतला ‘क्रोकस हॉल’. क्षमता ६३००. ‘पिकनिक’ या लोकप्रीय रॉक बँडचा कार्यक्रम होता. कार्यक्रम हाउस फुल होता. दहशतवादी टोळी हॉलच्या दारापाशी दिसली. चार किंवा पाच जण असावेत.त्यांच्या पाठीवर बॅकपॅक होते. हॉलशी पोचल्यावर त्यांनी बॅकपॅकमधून ऑटोमॅटिक बंदुका बाहेर काढल्या. गोळीबाराला सुरवात केली. समोर दिसेल त्याच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडत होते.  माणसं सैरावैरा पळू लागली. दहशतवादी दरवाजातून हॉलमधे घुसले. गोळीबार करतांनाच ते बॅकपॅकमधूम आग लावणारी रसायनं फेकत होते, आग लावत होते. हॉल पूर्ण भरलेला होता. शेतात औषधं फवारावीत तशा गोळ्या फवारल्या…

Read More Read More

पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. दूषित लोकशाही. ॥ Tainted Democracy: Viktor Orbán and the    Subversion of Hungary  by Zsuzsanna Szelényi. Hurst, 438 pp., £25. ।।  प्रस्तुत पुस्तक हंगेरीचे सध्याचे प्रधान मंत्री (प्रमं) व्हिक्टर ओर्बन यांचं राजकीय चरित्र आहे. १९९८ ते २००२ आणि २०१० ते २०२४ अशी १८ वर्षं ते हंगेरीचे प्रधान मंत्री आहेत. कसे  आहेत हे व्हिक्टर ओर्बन? ‘बेडुक घ्यायचा. पसरट भांड्यात पाण्यात ठेवायचा. बेडुक सुखात असतो. हळूहळू पाणी तापवायला सुरवात करायची. बेडकाच्या ते लक्षात येत नाही. पाणी उकळू लागतं तोवर वेळ निघून गेलेली…

Read More Read More

रविवार/घटनेची गुंडाळी

रविवार/घटनेची गुंडाळी

मी ‘कालनिर्णय’ साठी बॉब सिल्वर्स या संपादकावर लेख लिहीत होतो.  न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या एका जगन्मान्य पाक्षिकाचे सिल्वर्स हे संपादक. ६१ वर्षं ते संपादक होते. अनेको नोबेल विजेते लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादींनी सिल्वर्ससाठी लेखन केलं.  सिल्वर्सनी लेखक तयार केले. लेखनातली क्लिष्टता काढून टाकणं, लेखन प्रवाही ठेवणं, लेखन सोपं ठेवणं, ते अगदी स्पष्ट आणि समजेल असं ठेवणं या सवयी त्यांनी लेखकाना, भल्या भल्या लेखकांना लावल्या. मुख्य म्हणजे लेखन साधार असलं पाहिजे, तपशील असले पाहिजेत, पुरावे असले पाहिजेत असा त्यांचा…

Read More Read More

सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

सिनेमे. मेरियुपोलमधले २० दिवस.

माहितीपट मेरियुपोलमधे २० दिवस. रशियाच्या फौजा युक्रेनच्या हद्दीवर २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात उभ्या राहिल्या. युक्रेन-रशियाच्या पूर्व हद्दीवर मेरियुपोल हे शहर आहे. तिथं. पुतीननं या घटनेला युद्ध असं नाव दिलं नाही, विशेष लष्करी कारवाई असं पुतीन म्हणाले. एपी, असोसिएटेड प्रेस, या वृत्तसंस्थेच्या लक्षात आलं की १.५ लाख सैन्य ही काही सामान्य लष्करी कारवाई नाही. एपीनं ही घटना कव्हर करायचं ठरवलं. एपीचे कॅमेरामेन आणि बातमीदार एक टीम करून मेरियुपोलमधे पोचले.  बातमीदार पोचले त्या पहिल्या दिवशी सारं शांत होते. दुसऱ्या दिवशीपासून मेरियुपोलपासून काही…

Read More Read More

प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

ओदिसामधे भाजप, बीजू जनता दल (बीजेडी) यांची आघाडी  मोडली आहे. भाजप आणि बीजूदल आता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढवतील.  ओदिसात लोकसभेच्या २१ जागा आहेत. आजवर भाजप-बीजूदल अशी अलिखित आघाडी होती. बीजू दलाचे २० खासदार होते आणि भाजपचा १ खासदार होता. आघाडी टिकवायची असेल तर आपल्याला किमान १७/१८ जागा मिळायला हव्यात असा भाजपचा हट्ट होता. तेवढ्या जागा बीजूदल देत नाही या मुद्द्यावर आघाडी मोडली आहे. भाजपला जास्त जागा कां हव्याहेत? कारण भाजपला ४०० चा आकडा पार करायचा आहे.  गेल्या लोकसभेत भाजपचे एकूण…

Read More Read More

रविवार. दारू, मेंदूत हवी पण रक्तात नको.

रविवार. दारू, मेंदूत हवी पण रक्तात नको.

दारू मेंदूत हवी पण रक्तात नको.कार रस्त्यावर नाचू लागली की ब्रिटीश पोलिस चालकाला पकडतात. रक्तातलं अल्कोहोलचं प्रमाण तपासतात, जास्त निघालं की शिक्षा करतात.पिणाारा म्हणतो की दारू चढली तर पाहिजे पण तिनं एकाद दोन तासातच रक्तातून गायब झालं पाहिजे…..गंमतच. दारू प्याल्यानंतर काय होतं? दारू प्यायल्यावर समोरच्या गोष्टी दोनदोन तीनतीन दिसू लागतात. दारू प्यायल्यावर पाय लडखडायला लागतात. दारू प्यायल्यावर जिभेचा लोचा होता. जीभ जड होते,  मराठी माणूस  इंग्रजी बोलू लागतो. जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी डोकं दुखतं, जड होतं, पुढला दिवस वाईट…

Read More Read More

पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

पुस्तकं.’ होय, मीच ती बलात्कार झालेली स्त्री आहे’

I AM THE CENTRAL PARK JOGGER By TRISHA MEILI Pub. Scribner. || त्रिशा मेली या इनव्हेस्टर बँकर स्त्रीनं हे पुस्तक लिहिलंय.  १९८९ साली न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे एका जॉगिंगला गेलेल्या स्त्रीवर राक्षसी-क्रूर बलात्कार झाला होता. प्रकरण अमेरिकेत खूप गाजलं होतं. ती बलात्कार झालेली जॉगर मीच आहे असं लेखिकेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रस्तुत  पुस्तकात उघड केलंय.   शिर्षकात जॉगिंग म्हणजे पळणं आहे, पण पुस्तक पळण्यावर नाही.  लेखिका बँकर आहे, पण पुस्तक बँकिंग या विषयावर नाही.  लेखिकेवर झालेला बलात्कार आणि अत्याचार हे पुस्तकाला…

Read More Read More