Browsed by
Month: February 2014

लातूरचे रविंद्र गोवंडे, एक सात्विक, सज्जन, निस्वार्थी आणि बहुगुणी माणूस.   रविंद्र ऊर्फ नाना गोवंडे ऊर्फ गोवंडे सर वयाच्या ८२ व्या वर्षी लातूर इथे वारले. ते सिविल इंजिनियर होते.   सरांना पैसे मिळवण्यात रस नव्हता. घर चालवावं लागतं, घरात मुलं बाळं असतात, दररोज भाकर तुकडा लागतो म्हणून नाईलाजानं ते पैसे मिळवत असत. केलेल्या कामासाठी कोणाकडं पैसे मागणं त्यांना अवघड जात असे. घर, दुकान किंवा इमारतीचं डिझाईन करून झाल्यावर कित्येक माणसं पैशाचं विचारतच नसत. मग आतून गोवंडे वहिनी खुणावून सरांना पैशाचं बोला असं…

Read More Read More

केजरीवाल आता खोल पाण्यात उतरत आहेत. आता ते गंभीर राजकीय, आर्थिक भूमिकांकडं सरकत आहेत. आतापर्यंत ते भ्रष्टाचार या एका परीनं सर्वाना मान्य असणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत होते. वीज, पाणी, शिक्षण या गोष्टी सर्वांना मिळाल्या पाहिजेत हे त्यांचं मत तसं पाहिलं तर सर्व पक्ष आणि जनतेला मान्य आहे. पण  शिक्षण,आरोग्य, वीज, पाणी मिळायचं तर त्यासाठी एकादा आर्थिक-राजकीय विचार हवा. तो कोणता असेल यावर ते बोलत नव्हते. आता ते बोलले आहेत. इथून पुढं त्यांची आणि जनतेची खरी कसोटी सुरू होते. केजरीवाल म्हणाले की…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

केजरीवाल पहिल्या दिवसापासून म्हणत होते की भ्रष्टाचार कमी करणं हा त्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठीच जनलोकपाल विधेयक त्यांना आणायचं होतं. जनलोकपाल विधेयक होणार नसेल तर त्यांना सरकारात रस नाही असं ते म्हणत होते. ते विधेयक त्यांना मांडू देण्यात न आल्यानं त्यांनी राजीनामा दिला. काँग्रेस आणि भाजपचं म्हणणं असं त्यांचा जनलोकपालला विरोध नाही, ज्या वाटेनं ते विधेयक मांडलं त्याला विरोध आहे. ते विधेयक मांडण्याच्या प्रक्रियेवरून केजरीवाल, केंद्र सरकार, काँग्रेस-भाजप, काही  वकील यांच्यात मतभेद आहेत. तरीही  एक मुद्दा उरतोच. जनलोकपाल विधेयकाचं आश्वासन पूर्ण…

Read More Read More

ओबामा जखमी झाले होते तेव्हां बराक ओबामा अध्यक्ष झाल्यानंतरची गोष्ट. म्हणजे 2010 सालातली. ओबामा बास्केट बॉल खेळत होते. खेळतांना रोनाल्डो डेसेरेगाचं कोपर ओबामांच्या तोंडावर आदळलं. जखम झाली. डझनभर टाके पडले. ठीक. अध्यक्षांशी खेळण्यासाठी माणसांची काळजीपूर्वक निवड करणाऱ्यांनी रोनाल्डोला पुन्हा बोलावलं नाही. परंतू ओबामानी आपला फोटो त्या मागं स्वहस्ताक्षरात मजकूर लिहून रोनाल्डोला पाठवला. त्यात लिहिलं होतं ” गड्या. जगातला तू एकमेव माणूस आहेस ज्यानं अध्यक्षाला जखमी केलं परंतू ज्याला अटक झाली नाही. बराक.”

रिलायन्स  उद्योग समूहाच्या उद्योगांबद्दल पहिल्या पासून वाद आणि आक्षेप आहेत. उद्योगाला फायदा व्हावा यासाठी या उद्योगसमूहानं कायदे वाकवले, तुडवले, उल्लंघले. हे साधण्यासाठी राजकीय पक्ष, पुढारी, लोकप्रतिनिधी यांचा गैरवापर या उद्योगानं केला आहे. जकाती, कर इत्यादी गोष्टी या समूहाच्या फायद्यासाठी वाकवल्या  गेल्या. लोकप्रतिनिधी सामिल असल्यानं समूहावर कोणतीही कारवाई आजवर होऊ शकली नाही. लोकसभेत समूहाच्या उद्योगांवर चर्चा झाल्यावर कायद्यातल्या खोचा वापरून, संसदीय प्रणालीतल्या फटी वापरून समूहाची सुटका करण्यात आली. कम्युनिष्ट  पक्षाच्या  सदस्यांनी प्रकरण लावून धरलं, इतर पक्ष संसदीय प्रक्रियांच्या मागं लपून, भाषणं…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

आम्ही आंदोलनही करू आणि सरकारही चालवू हे केजरीवाल म्हणतात. त्यांचं हे विधान  गोंधळात टाकणारं आहे, परस्पर  विसंगत आहे, बुचकळ्यात टाकणारं आहे. केजरीवाल दोन पैकी नेमकं काय करणार आहेत असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण आपल्याला आंदोलन करणं आणि सरकार चालवणं या दोन स्वतंत्र, परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी वाटत आल्या आहेत. आजवरच्या आपल्या अनुभवावरून ती कसोटी आपण तयार केलेली आहे. केजरीवाल ज्या रीतीनं वर आले, ज्या कोंडीतून आणि गोचीतून वर आले त्याचा प्रभाव त्यांचे विचार आणि कामाची शैली यावर झाला…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

केजरीवाल सतत म्हणतात की त्यांना आंदोलनं करायची, निवडून यायची हौस नाही. भ्रष्टाचार होतोय, अगदी दैनंदिन गरजाही नागरिकांना भागवता येत नाहीत म्हणून त्यांना हे उद्योग करावे लागतायत.  राजकीय व्यवहार आणि व्यवस्था यात सुधारणा झाल्यास आपल्याला कामच उरणार नाही असं केजरीवाल म्हणतात. लोकांनी भ्रष्ट लोकांना संसदेपासून दूर ठेवल्यानंतर आप पार्टीची जरूरच  शिल्लक रहाणार नाही, ती पार्टी बरखास्त करता येईल आणि केजरीवालही आपल्या इतर कामाला लागतील.  एक राजकीय पक्ष काढायचा, वाढवायचा,चालवायचा यात त्यांना रस नाही.  त्यांना सरकारात  रस नाहीये,  जे कोणतं सरकार तयार…

Read More Read More

इतिहास

इतिहास

माध्यमांचा उथळपणा Pagan Britain हे पुस्तक रोनार्ड हटन या अमेरिकन अभ्यासकानं लिहिलं आहे. अश्म युगापासून तर ख्रिश्चॅनिटी येईपर्यंतचा काळ या पुस्तकात हटन यानी तपासला आहे. ब्रिटीश माणसाच्या धर्मश्रद्धा हा मुख्य धागा आहे. ब्रिटीश परंपरा, मिथकं, धार्मिक विधी यांच्याबरोबरच पुराणवस्तू संशोधकानी गोळा केलेल्या आर्टिफॅक्टसचा  अभ्यास त्यांनी केला आहे. दोन हजार वर्षापूर्वीच्या एका ब्रिटीश माणसाचे अवशेष 1984 साली वैज्ञानिकांनी हुडकले.  मरताना त्या माणसाचं वय 25 च्या आसपास असावं. त्याच्या गळ्याभोवती आणि अंगावर भयानक-घातक जखमांच्या खुणा आढळल्या. झालं. इतिहासाचे अर्थ लावणारे मैदानात उतरले….

Read More Read More

लोकसत्ताच्या दिनांक 5 फेबच्या अंकात कांबळे यांचा लेख आहे. त्यात त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या बाबत मुंडे यांनी केलेल्या विधानांचा तपशीलवार-साधार खुलासा केला आहे. त्यातला एक खुलासा आहे तो डॉ. आंबेडकरांना शामाप्रसाद  मुकर्जी यांनी राज्यसभेत पाठवलं या मुंडेच्या विधानासंदर्भात. आंबेडकर मुंबई विधानसभेच्या मतदार संघातून निवडून गेले होते, त्यांचा बंगालशी किंवा शामाप्रसाद मुकर्जींशी काहीही संबंध नाही हे कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे. शामाप्रसाद मुकर्जी हे संघाचे-जनसंघाचे-भाजपचे नेते. त्यांनी आंबेडकरांना राज्यसभेत पाठवलं याचा अर्थ ते आंबेडकर-दलित यांचे समर्थक होते असं मुंडेना सुचवायचं होतं. मुंडे…

Read More Read More