Browsed by
Month: April 2015

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

एनडीटीव्हीवर झालेल्या कार्यक्रमात एक काश्मिरी मुस्लीम तरूण बोलला. तो स्वतःला भारतीय मानत नव्हता. काश्मिर भारताचा भाग नाही, असू नये असं त्याचं मत होतं. भारतानं काश्मिरी लोकांवर कायम अन्यायच केला आहे, त्यांना दुराव्यानं वागवलं आहे असं त्याचं म्हणणं होतं. काश्मिरात झालेल्या उद्रेकाच्या पाठपडद्यावर हा कार्यक्रम झाला होता. पहिल्या प्रथमच काश्मिरी लोकांनी पाकिस्तानी झेंडे जाहीरपणे फडकावले होते. मसरत आलम नावाच्या एका फुटीर-पाकिस्तान धार्जिण्या माणसाला काश्मिर कोर्टानं तुरुगांतून सोडण्याच्या घटनेनं काश्मिरातल्या असंतोषाला सुरवात झाली. काश्मिर आणि भारत सरकारचं म्हणणं असं की मसरतला कोर्टानं…

Read More Read More

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

महत्त्वाची सर्जक कलाकृती समजायला जर तशीच सर्जकता लागत असेल तर हवीय कशाला तशी कलाकॄती ? सर्जकता, सर्जक कलाकृती, ती समजून घेण्यासाठी सर्जकता. कलाकृती सर्जक असू शकते किंवा सर्जक नसलेली भरड कलाकृती असू शकते.  सामान्य कोणीही माणूस चार ओळी लिहून तिला कविता म्हणू शकतो, त्याच्या दृष्टीनं ती कविताही असते. दोन पाच हजार शब्द लिहून एखादा त्या मजकुराला कथा म्हणू शकतो. साठ सत्तर हजार शब्द गोळा झाले तर  कादंबरी म्हणता येते.  कॅमेरा आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून क्लिप तयार करणं कोणालाही जमू शकतं,…

Read More Read More

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

२३ मार्च रोजी ली क्वान यू यांचं ९१ व्या वर्षी  निधन झालं. ली क्वान यू १९६५ साली सिंगापूरचे प्रधान मंत्री झाले. त्या वर्षी सिंगापूर मलेशियापासून वेगळा झाला. १९९९ साली ते प्रधान मंत्री पदावरून दूर झाले पण मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणून राहिले. २००४ साली ते मार्गदर्शक मंत्री म्हणून मंत्रिमंडळावर लक्ष ठेवून होते.  २०१४ पर्यंत म्हणजे सुमारे पन्नास वर्षं त्यांची सिंगापूरच्या सत्तेवर, राजकारणावर पकड होती. वयोमानानुसार ते मुख्य पदावरून निवृत्त झाले तरी या ना त्या स्वरूपात सिंगापूरची सत्ता त्यांच्याच हाती होती, त्यांच्या…

Read More Read More

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनच्या राजधानीवर सौदी अरेबियाची विमानं बाँब हल्ले करत आहेत. त्यांना इजिप्त, कतार, अरब अमिराती या देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचाही पाठिंबा आहे परंतु पाकिस्ताननं तिथं सैनिक पाठवायचं अजूनपर्यंत टाळलं आहे. सौदी अरेबिया सानामधे घुसलेल्या हुती सरकारला हुसकावण्याच्या प्रयत्नात आहे. गेले काही दिवस उत्तर येमेनमधे बलवान असलेल्या हुती या संघटनेनं येमेनच्या राजधानीचा ताबा घेतला असून साऱ्या येमेनवरच सत्ता मिळवण्याचा हुती या संघटनेचा इरादा आहे.  हुती या संघटनेकडंही भरपूर शस्त्रं आहेत. त्यामुळं लढाई तुंबळ आहे. येमेनी जनतेचं मत  विभागलेलं आहे. हुतीला पाठिंबा असलेले…

Read More Read More