Browsed by
Month: February 2020

बुद्धीमान बंडखोर लेखिका

बुद्धीमान बंडखोर लेखिका

वेवर्ड अँड वाईज या पुस्तकांच्या दुकानातल्या एका फेरीत  विराट चांडोक यांच्या टेबलावर नव्यानं मागवलेल्या पुस्तकांचे गठ्ठे होते. त्यात सुझन सोंटॅग अमेरिकन लेखिकेच्या पुस्तकांची एक चळत होती.   चळतीत ऑन फोटोग्राफी या पुस्तकाच्या दहा प्रती होत्या.ऑन फोटोग्राफी हे पुस्तक  १९७७ साली प्रसिद्ध झालं होतं. मला आश्चर्य वाटलं. १९६० च्या दशकातल्या एका अमेरिकन लेखिकेची पुस्तकं मुंबईतल्या पुस्तकांच्या दुकानात? पटकन मला आठवलं की या बाईंना मी फार वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्यांच्याबद्दल लोकांची टोकाची मतं होती. काही लोक त्यांना आउटस्टँगिंग लेखिका मानत होते तर काही…

Read More Read More

भारत सरकारचं वर्तन योग्य नाही.

भारत सरकारचं वर्तन योग्य नाही.

डेबी अब्राहम्स यांना भारत सरकारनं व्हिसा नाकारला. अब्राहम्स युकेच्या खासदार आहेत आणि युकेच्या संसदेनं नेमलेल्या काश्मिर प्रकरणाच्या कमीटीच्या अध्यक्ष आहेत. काश्मिरमधे जनतेचे लोकशाही अधिकार नाकारले जात आहेत, तिथल्या लोकांना नागरी स्वातंत्र्य नाकारलं जात आहे या मुद्द्यावर अब्राहम्स यानी वेळोवेळी निषेध आणि विरोध नोंदवला आहे. त्यांचं हे वर्तन देशविरोधी आहे असं ठरवून भारत सरकारनं त्याना प्रवेश नाकारला आहे. प्रत्येक देशाला परदेशी नागरिकाला देशात प्रवेश नाकारण्याचा अधिकार आहे. लोकशाहीच्या चौकटीत वावरणाऱ्या देशांनी हा अधिकार नाकारण्याच्या कसोट्या ठरवलेल्या असतात. देशाची सार्वभौमता टिकवणं ही…

Read More Read More

आयर्लंड आणि ब्रीटन: दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

आयर्लंड आणि ब्रीटन: दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.

आयर्लंड आणि ब्रीटन: दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं. ।। देश आपला कां असेना, परखडपणे आपल्या देशात घडणाऱ्या घटनांची समीक्षा करणं हे ब्रीटन, अमेरिका इथल्या समाजाचं वैशिष्ट्यं. फिंटन ओ टूल यांची पुस्तकं हे त्याचं एक उदाहरण. फिंटन ओ टूल हे आयरिश लेखक आहे आणि आयर्लंड या देशातील घटनांवर ते सतत लिहीत असतात. फिंटन ओ टूल यांचं ” हिरोईक फेल्युअरः ब्रेक्झिट अँड द पॉलिटिक्स ऑफ पेन ” हे पुस्तक गेल्या वर्षी (२०१८) प्रसिद्ध झालं. ब्रीटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचं अपयश कसं आपणहून ओढवून…

Read More Read More

राजकारणासोबत, राजकारणानादी नव्हे, अजीत नरदे.

राजकारणासोबत, राजकारणानादी नव्हे, अजीत नरदे.

राजकारणासोबत,  राजकारणानादी नव्हे शेती आणि शेतकरी हितासाठी झटणारे अजित नरदे यांचं  जयसिंगपूर या त्यांच्याच रहात्या  गावी  निघन झालं. एका  मोटार सायकलनं त्याना उडवलं. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर फार लोक स्तब्ध झाले. ज्या दिवशी त्यांना मोटारसायकलनं उडवलं त्याच दिवशी त्यांचं शेती प्रश्नावर मुंबईत भाषण व्हायचं होतं. नरदे यांना ओळखणाऱ्या माणसांकडं त्यांचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. कारण संपर्कात एकादं माणूस आलं की नरदे त्या माणसाला सोडत नसत, मागं लागून  त्या माणसाला कामाला लावत, त्यांच्यासोबत काम करत. काहीशा अनाकर्षक पद्धतीनं बोलत बोलत ते…

Read More Read More