Browsed by
Month: January 2022

रोजगाराचा प्रश्न

रोजगाराचा प्रश्न

बिहार आणि उत्तर प्रदेशातले बेकार तरूण काम मागत आहेत, देशात साडेपाच करोड माणसं रोजगाराच्या चिंतेत आहेत.

कोणीही जिंको वा हरो, फायदा भाजपचाच.

कोणीही जिंको वा हरो, फायदा भाजपचाच.

गोव्यातल्या ४० मतदार संघापैकी पणजी हा एक मतदार संघ. पणजी ही गोव्याची राजधानी असल्यानं आणि ते शहर जगप्रसिद्ध असल्यानं तिथली निवडणूक लक्षवेधक असणं स्वाभाविक आहे. पणजीत आता उत्पल पर्रीकर आणि बाबुश मॉंसेराट यांच्यात स्पर्धा आहे. उत्पल पर्रीकर अपक्ष आहेत, मॉंसेराट भाजपचे उमेदवार आहेत. शिव सेना, आप इत्यादी पक्ष उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देताहेत. उत्पल पर्रीकर भाजपचे सदस्य होते,  तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेत आणि त्यांनी पक्ष सोडलाय.   उत्पल पर्रीकरांची नाराजी तशी जुनीच आहे. एकदा २०१५ साली त्यांनी तिकीट मागितलं होतं. तेव्हां…

Read More Read More

देशात जन्मलेले नागरीक रातोरात देशद्रोही ठरवले जातात…

देशात जन्मलेले नागरीक रातोरात देशद्रोही ठरवले जातात…

अमेरिकेतल्या जपानी नागरिकांना अमेरिकेनं देशद्रोही ठरवून चार वर्षं तुरुंगात लोटलं होतं त्याला कालच्या डिसेंबरमधे ८० वर्षं झाली. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपाननं पर्ल हार्बर या बंदरातल्या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. जपान, अमेरिका युद्ध सुरु झालं. अमेरिकन सरकारनं लगोलग अमेरिकेत रहाणाऱ्या तमाम जपानी लोकांना देशद्रोही म्हणून जाहीर करून टाकलं. पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या अधिपत्याखालच्या हवाई बेटांमधील एक बेट.   हवाई बेटं आपलीच आहेत असा जपानचा दावा होता. १९४० च्या आधीची दहा वर्षं जपान आपलं साम्राज्य चीन, इंडोचीन, इंडोनेशिया, फिलीपीन्स इत्यादी विभागात…

Read More Read More

प्रिन्स अँड्र्यूज बलात्कारी?

प्रिन्स अँड्र्यूज बलात्कारी?

ब्रीटनचा राजा होण्याच्या रांगेत नवव्या नंबरवर असणारे राजपुत्र अँड्र्यूज अमेरिकेत एका खटल्यात अडकले आहेत. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे..

खोटारडा पंतप्रधान

खोटारडा पंतप्रधान

 बोरिस जॉन्सन यांच्या अधिकृत घरामधे, १० डाउनिंग स्ट्रीटमधे, गेल्या वर्षी ख्रिसमसची पार्टी झाली. पार्टीत चाळीस ते पन्नास माणसं हजर होती. पार्टी म्हटल्यावर जे काही होत असतं ते या पार्टीत झालं. सरकारी अधिकारी त्या पार्टीत होते. खुद्द बोरिस जॉन्सनही त्या पार्टीत काही वेळ सहभागी झाले होते. ज्या दिवशी पार्टी झाली त्याच दिवशी इंग्लंडमधे पाचेकशे माणसं कोविडनं मेली होती. पार्टीच्या आधी दोनच दिवस सरकारनं जनतेला सांगितलं होतं की कोविडपासून सावध रहावं,  समारंभ करू नयेत, पार्ट्या करू नयेत, लोकांनी एकत्र येऊ नये, ख्रिसमस साजरा…

Read More Read More

धर्म आणि राजकारण सांगड,डेस्मंड टुटु

धर्म आणि राजकारण सांगड,डेस्मंड टुटु

डेस्मंड टूटू वयाच्या नव्वदाव्या वर्षी वारले. टूटूंना १९८४ साली शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. द.आफ्रिकेत वर्णद्वेषी-वर्णभेदी  सरकार हटवून त्या ठिकाणी लोकशाही सरकार स्थापण्यात त्यांनी केलेली मदत (नेल्सन मंडेलांना) हे नोबेल पारितोषिकासाठी निमित्त, उल्लेखनीय कारण होतं. टूटू होसा या जमातीत जन्मले. (मंडेलाही त्याच जमातीचे) कॉलेज पार पडल्यावर ते धर्मशिक्षणाकडं वळले. इंग्लंडमधे त्यांनी अँग्लिकन चर्चमधे शिक्षण घेतलं आणि बिशप झाले. जोहानेसबर्गच्या उपनगरातल्या आपल्या वस्तीत त्यानी कामाला सुरवात केली. पण नंतर कित्येक वर्षं ऊच्च शिक्षण व चर्चच्या कामासाठी ते इंग्लंडमधेच वास्तव्य करून होते. या…

Read More Read More