Browsed by
Month: June 2024

सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

कॅसोविझ हा हॉलिवूड शैलीत फ्रेंच चित्रपट करणारा धडाडीचा फ्रेंच दिक्दर्शक. त्याचे चित्रपट जगभर पाहिले जातात, ते विचार करायला लावणारे असतात. असा हा दिक्दर्शक आता चित्रपट करणं बंद करायचं म्हणतोय. मॅथ्यू कॅसोविझला बोलताना पहाणं म्हणजे एक मजाच असते. मॅथ्यू कॅसोविझ (जन्म १९६७) हा एक फ्रेंच नट आणि दिक्दर्शक आहे. त्यानं दहाएक छोट्या फिल्म केल्यात, दहाएक फीचर फिल्म केल्यात आणि वीसेक फिल्ममधे काम केलंय. त्याच्या मुलाखती यूट्यूबवर सापडतात. सर्व मुलाखतीत त्याची दाढी खुरटलेली असते. ठरावीक लांबीचे केस तो कसे काय कायम टिकवून…

Read More Read More

रविवार. बटलर ब्रीटन.

रविवार. बटलर ब्रीटन.

।। तुमच्याकडं तुम्ही मराठी असूनही समजा हजार दोन हजार कोटी डॉलर असतील; तुम्हाला त्यावरचा कर चुकवायचा असेल; कायदे चुकवत ती रक्कम कुठं तरी गुंतवायची असेल  तर तुम्ही व्हर्जिन आयलंडवर जा. तिथं तुम्हाला भारतातले उद्योगपती, नट, पुढारी, वकील, खेळाडू भेटतील. तिथं पैसे ठेवायला ते तुम्हाला खचितच मदत करतील. ।। साम्राज्यं निर्माण होतात, विलयाला जातात. रोमन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य अशी किती तरी उदाहरणं घेता येतील. भारताच्या हिशोबात इसवी सनामागं साताठ शतकापासून ते थेट इसवी १९४७ पर्यंतच्या काळात पाच पन्नास लहान…

Read More Read More

पुस्तकं/सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तकपुस्तकं

पुस्तकं/सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तकपुस्तकं

पुस्तक : Knife लेखक : Salman Rushdie (April 2024)  # नाईफ (सुरा) हे सलमान रश्दी यांचं ताजं पुस्तक. २०२२ साली रश्दी यांच्यावर सुरी हल्ला झाला होता. हादी मटार या लेबनीज तरुणानं हा हल्ला केला होता. दीडेक महिना रश्दी यांच्यावर उपचार झाले. त्यांचा एक डोळा गेला, बाकी सारं सही सलामत राहिलं.  हल्ला झाला त्या क्षणापासून पूर्ववत होईपर्यंतच्या काळातले अनुभव प्रस्तुत पुस्तकात आहेत. त्या काळात रश्दी यांनी आपल्या आयुष्याकडं मागं वळून पाहिलं, चिंतन केलं. ते चिंतनही या पुस्तकात आहे. रश्दी हल्लेखोराला कल्पनेत…

Read More Read More

रविवार: डी डे

रविवार: डी डे

डी डे ६ जून २०२४.  डी डे. D Day. फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर, नॉर्मंडी गावाच्या परिसरात माणसं जमली. बरोब्बर ८० वर्षापूर्वी या गावात घडलेल्या घटनेची आठवण जमलेल्या लोकांनी काढली. ‘त्या’ दिवशी दोस्त देशांचे १ लाख ३० हजार सैनिक या समुद्र किनाऱ्यावर उतरले. त्यांनी फ्रान्सवर ताबा ठेवलेल्या जर्मन सैनिकांशी लढाई सुरु केली. नंतर ते लढत लढत जर्मनीत गेले आणि दीर्घ लढाईनंतर त्यांनी जर्मनीचा पाडाव करून दुसरं महायुद्ध संपवलं. या मोहिमेत मेलेल्या २२ हजार ४४२ ब्रिटीश सैनिकांच्या कबरी नॉर्मंडीत आहेत. मेलेल्या अेमेरिकन सैनिकांच्या…

Read More Read More

पुस्तकं/ब्रिटन सार्वभौम उरला नाही, खाजगी मालकीचा झालाय

पुस्तकं/ब्रिटन सार्वभौम उरला नाही, खाजगी मालकीचा झालाय

पुस्तक : Uncommon Wealth:Britain and the Aftermath of Empire. लेखक : Kojo Koram कोजो कोराम यांचं पुस्तक साम्राज्य कोसळल्यानंतरचा ब्रीटन या विषयावर आहे.  कोजो कोराम जन्मानं घाना या देशातले आहेत. १९५४ साली घाना ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झालं. घाना स्वातंत्र्याचा ५० वाढदिवस झाला तेव्हां त्यांचे आजोबा दुःखी होते. ते ब्रिटीश साम्राज्यात होते तेव्हां घानामधे गरीबी होती, विषमता होती, सर्वसामान्य माणसं हलाखीत जगत होते.   प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होत असताना स्वातंत्र्याला  ७० वर्ष होत आहेत, घानातल्या सामान्य माणसाची स्थिती पूर्वीसारखीच आहे. उंच…

Read More Read More

रविवार. डेंजरस तत्वज्ञ

रविवार. डेंजरस तत्वज्ञ

तत्वज्ञान हा मामला मुळातच स्फोटक असतो. तत्वज्ञान अमलात यायला लागलं की मग विचारूच नका. जुडिथ बटलर हे तत्वज्ञ आहेत. ते जगभर फिरतात, जिथं जिथं ते जातात तिथं त्यांच्या विरोधात निदर्शनं होतात, त्यांना धक्काबुक्की होते. अनेक युरोपिय देशांच्या पंतप्रधान-प्रेसिडेंटांनी त्यांच्यावर टीका केलीय; पोप तर म्हणतात की बटलर ख्रिस्ती धर्म नष्ट करत आहेत. आता पहा, जुडिथ बटलर जन्मानं आणि बायॉलॉजिकली स्त्री आहेत. पण त्या स्त्रीसारख्या वागत वावरत नाहीत. त्या म्हणतात की मी स्त्री आहे आणि पुरुषही आहे, मी लवचीक आहे. त्यामुळं जुडिथचा…

Read More Read More

पुस्तकं. मार्खेजची शेवटली, मरणोत्तर, कादंबरी.

पुस्तकं. मार्खेजची शेवटली, मरणोत्तर, कादंबरी.

Until August Gabriel Garcia Marquez. ।। मार्खेजची शेवटली, मरणोत्तर, कादंबरी. Until August Gabriel Garcia Marquez. ।। गॅब्रियल गार्सिया मार्खेज २०१४ साली वारला. त्याची अप्रकाशित कादंबरी ‘अनटिल ऑगस्ट’ प्रसिद्ध झालीय.  १९९९ साली मार्खेजला कॅन्सर झालाय हे कळलं. कॅन्सर झाल्याचं समजलं  तोवर मार्खेजचं डोकं नीट काम करत होतं. आठवणी आणि एक कादंबरी त्यानं करायला घेतली. २००२ मधे आठवणी प्रसिद्ध झाल्या आणि २००४ मधे त्याची मेमरीज ऑफ मेलंकली होअर्स ही कादंबरी प्रसिद्ध झाली. कॅन्सरचे उपचार सुरू असतानाच २००३ च्या सुमाराला मार्खेजला डिमेंशियाचा त्रास…

Read More Read More