सिनेमा ए डिफरंट मॅन
ॲडम पियर्सन हा एक ब्रिटीश नट आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचं डोकं आपटण्याचं निमित्त होऊन त्याला neurofibromatosis या व्याधीनं ग्रासलं. चेहऱ्याच्या कातडीखाली गुठळ्या झाल्या, चेहरा विरूप झाला. चेहरा विद्रुप पण गडी वर्तणुकीनं उमदा. त्याची आई कीव करायची, तुझं कसं रे होणार असा विलाप सतत करत असायची. पण हा गडी रंजीस झाला नाही. शिकला. मॅनेजमेंट केलं. नाना कामं करत राहिला. त्याच्या विद्रुपतेचा वापर करून त्याला मालिका, चित्रपटांत कामं मिळाली. पण त्यानं स्वतःचं बिझनेस मॅनेजमेंटचं कसब वापरलं, करमणुकीचे कार्यक्रम केले,…