परागंदा बशर असद काय करतील?
सीरियाचे अध्यक्ष बशर असद रशियात आश्रयाला गेले आहेत. रशियात राहून ते आपल्या समर्थकांच्या वाटेनं सीरीयातलं राजकारण चालवतील? रशियन सरकारच्या मदतीनं ते पुन्हा सीरियात प्रस्थापित होतील? इराणचे सर्वेसर्वा खोमेनी आणि इराणचे अध्यक्ष शहा यांच्यात संघर्ष होता. शहानी खोमेनीना घालवून दिलं. जवळ जवळ पंधरा वर्षं ते इराक आणि फ्रान्समधे होते. तिथून त्यांनी आपल्या समर्थकांना संघटित केलं, इराणमधे क्रांती घडवली आणि इराणमधे परतले. सुभाषचंद्र बोस देशाबाहेर गेले. परदेशात मदत गोळा करून त्यांनी आझाद हिंद सेना तयार केली. भारत स्वतंत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. …