ओकारी आणणारा सुंदर चित्रपट
चित्रपट सबस्टन्स. मुख्य भूमिका डेमी मूर ‘डेमी मूर’ ला गोल्डन ग्लोब बक्षीस मिळालं, ऑस्कर नामांकन मिळालय. ज्या सिनेमातल्या कामाबद्दल बक्षिस मिळालं तो सिनेमा आहे ‘सबस्टन्स’. या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचं ऑस्कर नामांकन मिळालंय. चित्रपटाची दिक्दर्शिका कोरेली फार्जिट हिला दिक्दर्शनाचं नामांकन मिळालंय. डेमी मूर आज ६२ वर्षाची आहे. सबस्टन्स हा सिनेमा तिनं गेल्या वर्षी म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी केला. या वर्षी अमेरिकेत टीव्ही, ओटीटी, सिनेमा, नाट्य, मालिका इत्यादी वर्गवारीत बक्षिसं मिळालेल्या अभिनेत्रीमधे पन्नाशीच्या पलिकडच्या बहुसंख्य आहेत. टायटॅनिकमधे गाजलेल्या केट विन्सलेटला एक…