किशोर वयाच्या सवयी
नेटफ्लिक्सवर चार भागाची लघुसीरियल चाललीय. ‘ॲडलसन्स’. पौगंडावस्था. किशोर वय. ही मालिका मार्चच्या शेवटल्या आठवड्यात पडद्यावर आली. कायच्या काय गाजतेय. ब्रिटीश खासदारांनी ती पाहिली. लोकसभेनंही ती जवळजवळ पाहिली. मंत्र्यांनी पाहिली आणि प्रधान मंत्र्याना आग्रह केला की ती पहावी. प्रधान मंत्री सध्या युक्रेनमधे गुंतलेत. ट्रंपनी नेटोमधून लक्ष काढलंय आणि युरोपीय देशांना वाऱ्यावर सोडलंय, तुमचं तुम्ही पहा अमेरिका तुम्हाला पैसे देणार नाही असं सांगितलंय. युरोपीय देशांची तंतरलीय. अशा गडबडीतही प्रधान मंत्री स्टार्मरनी ती पाहिलीय. असं काय आहे त्या मालिकेत? जेमी मिलर या १३…