Browsed by
Author: niludamle

अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट

कॅनडातलं वातावरण वेगानं बदललय. लोकांना उदारमती (लिबरल) राजकारण नकोय. त्यांना देशीवादाची भुरळ पडलीय.जगभर उमटलेल्या उजव्या लाटेत कॅनडा सापडला आहे. ❖ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपली  कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच आपल्या पदाचा राजिनामा देऊन मोकळे झाले. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आपण पक्षप्रमुख आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलो तर निवडणुकीत पराभव होईल याची खात्री त्यांना पटली. त्यांनी राजीनामा देताना पक्षानं दुसरा पंतप्रधान निवडावा असं म्हटलं आहे.  त्यांच्या जागी त्यांचा लिबरल पक्ष नवा नेता निवडेल आणि तो माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊन पुढील निवडणुकीला…

Read More Read More

ओकारी आणणारा सुंदर चित्रपट

ओकारी आणणारा सुंदर चित्रपट

चित्रपट सबस्टन्स. मुख्य भूमिका डेमी मूर  ‘डेमी मूर’ ला गोल्डन ग्लोब बक्षीस मिळालं,  ऑस्कर नामांकन मिळालय. ज्या सिनेमातल्या कामाबद्दल बक्षिस मिळालं तो सिनेमा आहे ‘सबस्टन्स’. या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचं ऑस्कर नामांकन मिळालंय. चित्रपटाची दिक्दर्शिका कोरेली फार्जिट हिला दिक्दर्शनाचं नामांकन मिळालंय. डेमी मूर आज ६२ वर्षाची आहे. सबस्टन्स हा सिनेमा तिनं गेल्या वर्षी म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी केला. या वर्षी अमेरिकेत टीव्ही, ओटीटी, सिनेमा, नाट्य, मालिका इत्यादी वर्गवारीत बक्षिसं मिळालेल्या अभिनेत्रीमधे पन्नाशीच्या पलिकडच्या बहुसंख्य आहेत. टायटॅनिकमधे गाजलेल्या केट विन्सलेटला एक…

Read More Read More

पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

पुस्तक. मुल्ला गफूर ते टाटा

आजही टाटांचं नाव घेतलं की टॅक्सीवालाही भारावून जातो. अंबानींचं नाव घेतल्यावर मात्र लोक तोंड आंबट करतात. असं कां होतं.  ❖ पुस्तक : India before the Ambanis: A history of Indian Business, Money and Economy. लेखिका : Lakshmi Subramanian.  ❖  अंबानी यांच्या आधीचा भारत या शीर्षकावरूनच पुस्तकात काय असेल याचा अंदाज येतो.  धीरूभाई अंबानी हे आधुनिक भारतातले सर्वात मोठे बिझनेसमन. एडनमधे त्यांनी निर्यात व्यवसाय केला. त्यात  मिळालेले पैसे घेऊन १९५८ साली धीरूभाई भारतात परतले. बाजाराचं म्हणणं त्यांना उत्तम कळू लागलं होतं….

Read More Read More

दारू. डेंजर. पिणं कमी होईल?

दारू. डेंजर. पिणं कमी होईल?

इथून पुढं कधीही दारूच्या बाटलीवर कवटी हाडाचं चिन्हं दिसू शकेल. ज्या कुठल्या बाटलीत अल्कोहोलवालं पेय असेल अशा प्रत्येक बाटलीवर. त्या चिन्हाखाली लिहिलेलं असेल ‘दारू आरोग्याला हानीकारक  ठरू शकते. दारूमुळं सतरा प्रकारचे कॅन्सर संभवतात. दारु पिण्यापूर्वी विचार करावा.’  वरील सूचना सर्जन जनरलनं अमेरिकन काँग्रेससमोर ठेवली आहे; अमेरिकन काँग्रेसनं कायदा करावा असा त्या सूचनेमागचा उद्देश आहे.  सर्जन जनरल हे अमेरिकेच्या आरोग्याची काळजी घेणारं एक पद आहे. हज्जारो संशोधकांनी केलेल्या ताज्या आरोग्य विषयक संशोधनाच्या आधारे सर्जन जनरल वेळोवेळी अमेरिकन माणसाला सल्ला देत असतो….

Read More Read More

सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.

सिनेमा. सोवियेत बस स्टॉप.

सोवियेत बस स्टॉप्स. माहितीपट.  आपला अनुभव. गावाच्या बाहेर, हमरस्त्याच्या कडेला एक बस स्टॉप असतो. परगावी जाणारी बस तिथं थांबते. गावातून बऱ्याच अंतरावर माणसं स्टॉपवर येतात. काही काळ तिथं सामान घेऊन थांबायचं. बस आली की जायचं. एक छप्पर, आडोशासाठी भिंत, येवढं पुरेसं असतं, करायचीय काय त्यासाठी एकादी वास्तू.   १९९० पूर्वीच्या सोवियेत युनियनची गोष्टच वेगळी आहे. तिथं बस स्टॉप म्हणजे एक कलात्मक वास्तू होती. विचारपूर्वक, मेहनतीनं केलेलं बांधकाम. एकाद्या गावात नव्हे तर गावोगाव. सोवियेत युनियनच्या पंधरा राज्यांत असे  किती तरी कलात्मक…

Read More Read More

सिनेमे. मिस्ट्रेस डिस्पेलर

सिनेमे. मिस्ट्रेस डिस्पेलर

 मिस्ट्रेस डिस्पेलर. आधुनिक जगाचं एक लक्षण म्हणजे जोडप्यांतला बेबनाव.   पती पत्नी एकमेकापासून तुटू लागण्याचं एक कारण असावं वेल्फेर स्टेट.  साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर वेल्फेर स्टेट ही कल्पना साकार होत गेली. माणसं वाऱ्यावर सोडली जात नाहीत. माणसाच्या गरजा भागवण्यासाठी, संकटकाळात मदतीसाठी स्टेट (सरकार) सरसावलंय. ज्या गोष्टी कुटुंब आणि परिवार सांभाळत होत्या त्या गोष्टी आता स्टेट (सरकार)करू लागलंय. उदा. स्त्री. आता स्त्री शिकते, स्वतंत्रपणे पैसे मिळवते, पैसे मिळवणं ही आता पुरुषाची मक्तेदारी राहिलेली नाही. स्त्री एकटी हिंडू शकते. स्त्री एकटी कामाच्या ठिकाणी…

Read More Read More

फेथुल्ला गुलेन

फेथुल्ला गुलेन

 सीरियाचे अध्यक्ष बशर असद रशियात आश्रयाला गेले आहेत. रशियात राहून ते आपल्या समर्थकांच्या वाटेनं सीरीयातलं राजकारण चालवतील? रशियन सरकारच्या मदतीनं ते पुन्हा सीरियात प्रस्थापित होतील?  सुभाषचंद्र बोस देशाबाहेर गेले. परदेशात मदत गोळा करून त्यांनी आझाद हिंद सेना तयार केली. भारत स्वतंत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.  इराणचे सर्वेसर्वा खोमेनी आणि इराणचे अध्यक्ष शहा यांच्यात संघर्ष होता. शहानी खोमेनीना घालवून दिलं. जवळ जवळ पंधरा वर्षं ते इराक आणि फ्रान्समधे होते. तिथून त्यांनी आपल्या समर्थकांना संघटित केलं, इराणमधे क्रांती घडवली आणि इराणमधे परतले….

Read More Read More

अमेरिकेतली रस्त्यावर जगणारी माणसं

अमेरिकेतली रस्त्यावर जगणारी माणसं

अमेरिका आयडाहोमधून निघून ओरेगन मार्गे लास व्हेगासला जाताना वाटेत नेव्हाडाचं वाळवंट लागतं. हॉलीवूडच्या चित्रपटात हे वाळवंट एकेकाळी खूप दिसायचं. झुडुपांचा समुद्र पसरलेला. कित्येक मैल दोन्ही बाजूला एकही घर दिसत नाही. पर्वत दिसतात खूप दूरवर क्षितिजाला बिलगून. वाटेत   पेट्रोल पंप नसतो, तहान लागली तर प्यायला पाणी मिळत नाही. इंटरनेटचं कनेक्शन नसल्यानं जीपीएस चालत नाही.  वाटसरू किंवा कारप्रवासी भीषण एकांतात सापडतो. टाकीत पुरेसं पेट्रोल भरलेलं नसलं आणि टाकी रिकामी झाली तर मरणच. जाणाऱ्या येणाऱ्यानं दया दाखवली तरच सुटका होणार. अशा एकांतात…

Read More Read More

परागंदा बशर असद काय करतील?

परागंदा बशर असद काय करतील?

सीरियाचे अध्यक्ष बशर असद रशियात आश्रयाला गेले आहेत. रशियात राहून ते आपल्या समर्थकांच्या वाटेनं सीरीयातलं राजकारण चालवतील? रशियन सरकारच्या मदतीनं ते पुन्हा सीरियात प्रस्थापित होतील?  इराणचे सर्वेसर्वा खोमेनी आणि इराणचे अध्यक्ष शहा यांच्यात संघर्ष होता. शहानी खोमेनीना घालवून दिलं. जवळ जवळ पंधरा वर्षं ते इराक आणि फ्रान्समधे होते. तिथून त्यांनी आपल्या समर्थकांना संघटित केलं, इराणमधे क्रांती घडवली आणि इराणमधे परतले. सुभाषचंद्र बोस देशाबाहेर गेले. परदेशात मदत गोळा करून त्यांनी आझाद हिंद सेना तयार केली. भारत स्वतंत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. …

Read More Read More

सिनेमे. मतीमंदांबद्दलच्या कल्पनांना धक्का देणारा चित्रपट

सिनेमे. मतीमंदांबद्दलच्या कल्पनांना धक्का देणारा चित्रपट

सायमन ऑफ द माऊंटन सायमन ऑफ द माऊंटन हा अर्जेंटाईन चित्रपट आहे. सायमन हे चित्रपटातलं मुख्य पात्र आहे. सायमनचं चेहरा वेडावाकडा करणं, ॲनिमेटेड हालचाली करणं यावरून सायमन मतीमंद आहे हे जाणवतं. सायमनच्या घरात आई आहे आणि आईचा बॉय फ्रेंड आहे. सायमन मतीमंद मुलांच्या शाळेत जात नाही कारण त्याच्याकडं तो मतिमंद असल्याचं सर्टिफिकेट नाही. सायमन त्याच्या आईच्या बॉयफ्रेंडच्या वाहतूक व्यवसाय हमाली करतो. सायमन घरात सुखी नाही. सायमनची गोची आहे. त्याचा पिता मेलाय. एक दुसराच पिता घरात आलाय. कदाचित ती आईची गरजही…

Read More Read More