ब्रीटनमधे दंगल कां झाली
ब्रीटनमधे जातीयवादी माणसं दंगली करतात. मतं मिळावी यासाठी राजकीय पक्ष जातीयवादाला चिथावणी देतात. पण जातीयावाद्द्यांना विरोध करणाऱ्या नागरिकांची संख्या जातीयवादींपेक्षा जास्त आहे. जातीयवादी अल्पसंख्य आहेत. नागरिकांचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न बिकट होतात तेव्हां जातीयवादी-अतिरेकी पक्ष लोकांच्या मनातील द्वेष/असंतोष जोजवतात. दैनंदिन, आर्थिक प्रश्न सुटेनासे होतात तेव्हां द्वेष फोफावतो. ।।।।।। २९ जुलै २०२४. उत्तर इंग्लंडमधल्या साऊथपोर्ट गावात एका नृत्याच्या क्लासमधे एक तरूण घुसला. त्यानं तिथं शिकत असलेल्या ६ ते १२ वर्षाच्या मुलींना भोसकलं. मुलीना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवरही त्या तरणानं वार केले. या…