पुस्तकं/फ्रेंच दिक्दर्शक अमेरिकन दिक्दर्शकाची मुलाखत घेतो.
एका प्रतिभावान दिक्दर्शकानं दुसऱ्या प्रतिभावान दिक्दर्शकाची मुलाखत घ्यायची ही कल्पना कशी आहे? तीही पूर्वकल्पना देऊन. तीही खूप तयारी करून. तीही कित्येक दिवस. तसं घडलंय. फ्रान्सवा त्रुफॉनं आल्फ्रेड हिचकॉकची मुलाखत घेतलीय. त्याचं पुस्तक झालं. त्या पुस्तकाच्या आवृत्या निघाल्या. मुलाखत १९६२ साली घेतली. संपादित व्हायला १९६६ साल उजाडलं. १९६७ साली पुस्तक प्रसिद्ध झालं. हिचकॉकच्या मृत्यूनंतर या पुस्तकात भर घालून १९८० साली पुस्तक नव्यानं प्रसिद्ध झालं. चित्रपट या विषयावरचं एक सर्वोत्कृष्ट पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन करतात. हिचकॉक १९५७ साली त्याच्या पस्तिसाव्या फिल्मच्या…