रविवार. बटलर ब्रीटन.
।। तुमच्याकडं तुम्ही मराठी असूनही समजा हजार दोन हजार कोटी डॉलर असतील; तुम्हाला त्यावरचा कर चुकवायचा असेल; कायदे चुकवत ती रक्कम कुठं तरी गुंतवायची असेल तर तुम्ही व्हर्जिन आयलंडवर जा. तिथं तुम्हाला भारतातले उद्योगपती, नट, पुढारी, वकील, खेळाडू भेटतील. तिथं पैसे ठेवायला ते तुम्हाला खचितच मदत करतील. ।। साम्राज्यं निर्माण होतात, विलयाला जातात. रोमन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य अशी किती तरी उदाहरणं घेता येतील. भारताच्या हिशोबात इसवी सनामागं साताठ शतकापासून ते थेट इसवी १९४७ पर्यंतच्या काळात पाच पन्नास लहान…