झपाटलेली आणि निर्मनुष्य घरं

झपाटलेली आणि निर्मनुष्य घरं

अमेरिकेतली ओस आणि झपाटलेली घरं घर विकणं ही एक कला आहे, ते एक कसब आहे.   पहिल्या दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट असतो. रस्त्यावरचा गजबजाट, कार आणि ट्रकचे आवाज त्रास देतात.  एजंट सांगतो ‘अहो तुम्ही पटकन जिने उतरून जाऊ शकता. विसाव्या मजल्यावरच्या माणसाला समजा काही प्रॉब्लेम आले तर तो काय करेल? तुम्ही पटकन उतरून जाऊ शकता. मनात आलं की पटकन घराबाहेर पडू शकता….तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे पाय जमिनीवर असतील. या फ्लॅटला फार मागणी आहे. बँकेकडून कर्ज मिळालं नाही म्हणून बहुतेक गिऱ्हाईकं हा…

Read More Read More

पुस्तकं : विदुषकाचा शोध

पुस्तकं : विदुषकाचा शोध

राजदरबारातल्या  विदुषकाचा  शोध ❖ पुस्तक  :    Fool: In Search of Henry VIII’s Closest Man लेखक   :    Peter K. Andersson. ❖   विदूषक हा पुस्तकाचा, संशोधनाचा विषय होऊ शकतो.  सोळाव्या शतकात इंग्लंडमधे आठव्या हेन्रीनं दरबारात विल सोमर नावाचा ‘फूल’, fool, नेमला होता. पीटर अँडरसननी विल सोमरचं चरित्र प्रस्तुत पुस्तकात रेखाटलं आहे.   सोमर आठव्या हेन्रीचा विश्वासू होता, त्याच्या जवळचा होता, कदाचित त्याचा सल्लागारही असावा.हेन्रीनंतरही तो पुढल्या राणीच्या दरबारात होता.  हेन्रीला सहा राण्या होत्या.एक लग्न पोपनं धर्मबाह्य ठरवलं, नाकारलं….

Read More Read More

चीनला लोकसंख्या वाढवायचीय

चीनला लोकसंख्या वाढवायचीय

 एका चिनी तरूण मुलीला सरकारी कचेरीतून फोन आला. ‘तुमची मासिक पाळी झाली कां? तुम्ही नव्या मुलाचा प्रयत्न कां करत नाही?’ ती स्त्री रागावली.  आपल्या  खाजगी आयुष्यात कोणी ढवळाढवळ करतंय हे तिला आवडलं नाही.  ती स्त्री चकीत झाली. चीन सरकार आजवर म्हणत आलं की एकापेक्षा जास्त मुलं नकोत;  आता  हा टिकोजीराव नवं मूल काढा असा आग्रह करतोय; याचं तिला आश्चर्य वाटलं. तिनं शेजारमैत्रिणींकडं चौकशी केली. त्यानाही असेच फोन आले होते. हा काय प्रकार आहे  तिला समजेना. भारतात मोहन भागवत स्त्रियांना सांगत…

Read More Read More

सिनेमे आय एम नेवेंका

सिनेमे आय एम नेवेंका

गोवा चित्रपट महोत्सवातला एक वेधक चित्रपट  आय एम नेवेंका नेवेंका नावाची तरूण मुलगी. माद्रीद या शहरातली. ती पॉनफेरेडा या गावाच्या नगरपालिकेत नोकरीसाठी येतेय. मेयर इस्माईल तिला पंखाखाली घेतो, तिच्यावर महत्वाच्या कामगिऱ्या सोपवतो, तिला भाव देतो. तिला आपलंसं करतो. जवळीक करतो. लगट करतो. बलात्कारही करतो. नेवेंका नकार देते. मेयर ब्लॅक मेलिंग करतो. नेवेंका धिटाईनं प्रतिकार करते. शेवटी मेयर उघडा पडतो, त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते.   मी टू चळवळ सुरु झाल्यापासून खूप महिलांनी धिटाईनं त्यांच्यावर झालेल्या बलात्कारांना वाचा फोडली. माध्यमांत साऱ्या गोष्टी…

Read More Read More

राज कपूर. एक पूर्ण सिनेमापुरुष

राज कपूर. एक पूर्ण सिनेमापुरुष

राज कपूर वयाच्या तिसऱ्या वर्षी १९२७ साली मुंबईत आला. पृथ्वीराज कपूर हे त्याचे वडील. राज कपूरचं त्यावेळचं नाव होतं सृष्टीनाथ कपूर. पृथ्वीराज पेशावरहून मुंबईत आले होते कारण ते अर्देशीर इराणीच्या आलम आरा या भारतातल्या पहिल्या बोलपटात काम करणार होते.  मुंबईत मुंबईत पोचल्यावर लगोलग  वयाच्या पाचव्या वर्षी राज कपूरनं  टॉय कार्ट या नाटकात काम केलं. त्यात त्याला बक्षीसही मिळालं.  १९३५ मधे ‘इन्किलाब’ मधल्या  अभिनयानं  राज कपूरची चित्रपट कारकीर्द सुरु झाली.   ❖ तो काळ कसा होता? १९३६ मधे व्ही शांताराम यांच्या …

Read More Read More

पुस्तक. अँगेला मर्केल यांचं प्रांजळ आत्मचरित्र

पुस्तक. अँगेला मर्केल यांचं प्रांजळ आत्मचरित्र

❖ पुस्तक   : Freedom. Memoirs 1954-2021. लेखिका : Angela Merkel ❖ फ्रीडम या आत्मचरित्रात अँगेला मर्केल आपण राजकारणात जे जे केलं त्याचं समर्थन करत नाहीत की आपल्या विरोधकांचा समाचार घेत नाहीत. एकेकाळी   जर्मनीची राणी असं म्हटलं जात असे त्या मर्केल कशा वाढल्या आणि घडल्या याचा अंदाज प्रस्तुत आत्मचरित्रात येतो.  आत्मचरित्रात भेटलेल्या सेलेब्रिटींपेक्षा किचनच्या आठवणी अधिक तपशीलवार आढळतात. अँगेला मर्केल २००५ ते २०२१ अशी १६ वर्षं जर्मनीच्या चान्सेलर होत्या. २०२२ च्या निवडणुकीत भाग घेणार नाही असं म्हणून त्या आपणहून…

Read More Read More

सिनेमा ए डिफरंट मॅन

सिनेमा ए डिफरंट मॅन

  ॲडम पियर्सन हा एक ब्रिटीश नट आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचं डोकं  आपटण्याचं निमित्त होऊन त्याला neurofibromatosis या व्याधीनं ग्रासलं. चेहऱ्याच्या कातडीखाली गुठळ्या झाल्या, चेहरा विरूप झाला.  चेहरा विद्रुप पण गडी वर्तणुकीनं उमदा. त्याची आई कीव करायची, तुझं कसं रे होणार असा विलाप सतत करत असायची. पण हा गडी रंजीस झाला नाही. शिकला. मॅनेजमेंट केलं. नाना कामं करत राहिला. त्याच्या विद्रुपतेचा वापर करून त्याला   मालिका, चित्रपटांत कामं मिळाली. पण त्यानं स्वतःचं बिझनेस मॅनेजमेंटचं कसब वापरलं,  करमणुकीचे कार्यक्रम केले,…

Read More Read More

स्कॅाच ते वाईन. ब्रीटन.

स्कॅाच ते वाईन. ब्रीटन.

जगभरात वाईन पिण्यात फ्रान्स आघाडीवर असतो आणि इटाली वाईन निर्मितीत आघाडीवर असतो. दोन्ही बाबतीत ब्रीटन खूपच मागं आहे. पण आता ब्रीटन वाईन निर्मितीत उतरला आहे. हवामान बदलाचा ‘दुष्परिणाम’ ब्रीटनच्या पथ्थ्यावर पडला आहे. स्कॉच निर्माण करणारा देश वाईन निर्माता होऊ पहातोय. ।। अगदी काल परवापर्यंत तुम्ही पॅरिसच्या बारमधे वेटरला ब्रिटीश वाईन आण असं सांगितलं असतंत तर त्यानं तुम्हाला हाकलून दिलं असतं. शेजारी बसलेल्या फ्रेंच माणसाला विचारलं असतंत ‘काय भाऊ, ब्रिटीश वाईन घेऊया काय?’ तर तो हसला असता. ब्रिटीश आणि वाईन? काय…

Read More Read More

पुस्तक. युक्रेन युद्ध, बायडन ट्रंप यांच्यातला बुद्धीबळाचा खेळ

पुस्तक. युक्रेन युद्ध, बायडन ट्रंप यांच्यातला बुद्धीबळाचा खेळ

रशियानं २०२२ मधे आक्रमण केल्यानंतर युक्रेननं पहिल्या प्रथम १८ नव्हेंबर २०२४ या दिवशी रशियावर क्षेपणास्त्रं फेकली. क्षेपणास्त्रं  आधीच युक्रेनला दिली होती, वापरण्याची परवानगी दिली नव्हती. ती परवानगी मावळते अघ्यक्ष जो बायडन यांनी १७ नव्हेंबरला दिली.  १० जानेवारी २०२५ रोजी बायडन यांना अध्यक्षपदाची सूत्रं डोनल्ड ट्रंप यांच्याकडं सोपवायची आहेत. तोवर बायडन यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. या तरतुदीचा फायदा बायडन यांनी घेतलाय. क्षेपणास्त्रं फेकण्याचा निर्णय फार मोठा आहे. अमेरिकेची शेकडो क्षेपणास्त्रं युक्रेनकडं आहेत. रशियाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. रशिया अण्वस्त्रं…

Read More Read More

एआयची घातकता

एआयची घातकता

रात्री आठची वेळ होती. एक तरूण विंडसर किल्ल्याच्या भिंतीवर चढण्याच्या बेतात होता. तोंडावर मास्क होता, हातात एक धनुष्य बाण होता. तरुणाचं नाव होतं जसवंत चैल. पहारेकऱ्यानं पकडलं. २०२१ साली धनुष्यबाण घेणारा माणूस भिंतीवर कां बरं चढत असेल? पहारेकऱ्याला प्रश्न पडला. ‘मला राणीला मारायचंय!’ पोलिस बुचकळ्यात पडला. थप्पड मारून घालवून द्यावं असंच पहारेकऱ्याला वाटलं असणार. पण अटक करणं भाग होतं. जसवंत चैलचा खरंच राणीला मारायचा बेत होता. पोलिसांनी जबाब घेतला तेव्हां पहिल्या झटक्यातच जसवंतनं सांगून टाकलं. जसवंत चैलचा ब्रिटीशांवर राग होता….

Read More Read More