दुबई ते तेल अवीव …
दुबई तेल अवीव फ्लाईटवर काय घडलं? ३० सप्टेंबर २०२६ रोजी तेल अवीवला जाणारं फ्लायदुबई या कंपनीचं विमान दुबईवरून उडालं. ३.५ तासांचा प्रवास, १७० प्रवासी होते, बहुतेक इस्रायली होते. स्मित मच्छर आणि हम्माम अल हम्मामी हे दोन पायलट होते. विमान सुरु झाल्यावर काही वेळानं हम्मामनं खुर्चीच्या मागं ठेवलेला हातोडा हस्तगत केला आणि स्मित मच्छरवर हल्ला केला. संकट समयी काच फोडण्यासाठी हा हातोडा ठेवलेला असतो, तो लॉक्ड नसतो, खुल्ला असतो. हल्ला झाला,स्मित कोसळला. विमान वेगानं जमिनीकडं निघालं. ३४ हजार फुटावरून झपकन १४…