अॅलन टुरिंग
अॅलन टुरिंग या वैज्ञानिकाची ब्रिटीश राणीनं माफी मागितली आहे. १९५४ साली टुरिंगनं आत्महत्या केली. तो समलिंगी स्वभावाचा होता. त्या काळात समलिंगी स्वभाव आणि संबंध ही गोष्ट गुन्हा मानली गेली होती. सरकारनं जबरदस्ती करून अघोरी रासायनिक उपचार करून त्याला ‘ नैसर्गिक ‘ करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारनं केलेल्या छळाला कंटाळून टुरिंगनं आत्महत्या केली होती. अॅलननं जर्मन सैन्याची गुप्त लिपी फोडली, त्यातून जर्मन हवाई हल्ल्यांपासून हज्जारो ब्रिटीश माणसांचे प्राण वाचले. कंप्युटर विज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे प्रांत त्यानं सुरु केले. त्यानं…