केजरीवाल यांना सल्ला देणारे लेख नाणावलेले पत्रकार लिहीत आहेत. त्यात गोविंदराव तळवलकर आहेत, एम जे अकबर आहेत. कित्येक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे हे पत्रकार सल्ले देत आहेत, मतं मांडत आहेत. ते योग्य आहे, समजण्यासारखं आहे. मेघनाद देसाईंनीही केजरीवाल इवेंट जगात इतरत्र इतर वेळी घडलेल्या घटनांच्या प्रकाशात तपासला आहे. एक लाट तयार होते. एक वातावरण इमर्ज होतं. त्यात माणसं सत्तेत, विधीमंडळात फेकली जातात. काही काळानंतर लाट ओसरते, वातावरण निवळतं आणि इमर्ज झालेली माणसं विस्मृतीत जातात, इतिहासातली एक छोटीशी नोंद होतात. तळवलकर, मेघनाद…
केजरीवाल
केजरीवाल हा एक इवेंट आहे. इमरजंट आहे. अनेक लोकांनी स्वतंत्र हेतू बाळगून केलेल्या हालचालीतून ही घटना घडली आहे. केजरीवाल सत्ता स्थापन करतील असं लोकांना वाटलंही नसणार. लोकांच्या ढोबळ अपेक्षा तेवढ्या केजरीवालांना माहित होत्या. म्हणजे वीज, पाणी इत्यादी. परंतू त्याच माणसांना केजरीवाल यांनी मंत्री म्हणून कसं वागावं या बद्दलही अपेक्षा होत्या. त्या काही मतदानात प्रतिबिंबित झालेल्या नव्हत्या. त्यांना अपेक्षित नसलेल्या अनेक गोष्टी केजरीवाल करत जातील कारण त्या गोष्टी करू नयेत असं काही लोकांनी त्यांना सांगितलेलं नव्हतं. कोणाला नुसतं पाणी हवं होतं,…
प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी
प्रस्थापित पक्षांची दिवाळखोरी आणि केजरीवाल बरखा दत्त यांनी एनडीटीव्ही या वाहिनीवर केजरीवाल यांची दीर्घ मुलाखत घेतली. आप पक्षाबद्दल लोकांकडून घेतल्या जाणारे आक्षेप दत्त यांनी मांडले. विरोधी पक्षा या बुरख्यामागं दडून बरखांनी माध्यमांना वाटणारे आक्षेपच मांडले. अनेक मुद्द्यांवर केजरीवालांनी स्पष्टीकरणं दिली. त्यातले लक्षणीय असे काही मुद्दे. 1. ” मी डावा किंवा उजवा नाही. मला डावं, उजवं म्हणजे काय ते समजत नाही. मला येवढंच समजतं की लोकांना पाणी हवंय,वीज हवीय, पारदर्शकता हवीय, सुशासन हवंय.” केजरीवाल यांच्या या भूमिकेमुळंच आधीचा राजकारणाचा अनुभव नसतांनाही…