Browsed by
Month: April 2014

सेलफोवरून मतदान. मतदार   यादीतल्या गोंधळामुळं यंदाच्या निवडणुकीत लाखो मतदारांना मतदान करता आलं नाही. असं दिसतंय की मतदार यादी तयार करताना अनेक चुका त्या यंत्रणेतल्या माणसांकडून झाल्या आहेत. त्याच बरोबर मतदारांनीही पुरेशी  जागरूकता दाखवलेली नाही. यादी नव्यानं तयार झाल्यावर ती वेबसाईटवर टाकण्यात आली होती, यादीच्या सीड्या राजकीय पक्षाना देण्यात आल्या होत्या. फार कमी मतदारांनी यादीतल्या चुका दुरुस्त करण्याची तसदी घेतली. तेव्हां मतदार नोंदणी यंत्रणेतले दोष दूर करून आणि मतदारांनी थोडीशी जागरूकता दाखवून या बारीला झालेले घोटाळे भविष्यात टाळता येतील. तथापि उपलब्ध…

Read More Read More

दिनानाथ बात्रा या एका शाळेच्या हेड मास्तरना 1999 साली सत्तेत आलेल्या भाजपनं इतिहास पुनर्लेखनाच्या कामी नेमलं. पाठ्य पुस्तकाचं पुनर्लेखन ही त्यांची जबाबदारी. त्यांनी पाठ्यपुस्तकातून जात आणि गोमांसभक्षणाचे उल्लेख वगळले. इतरही अनेकानेक बदल केले. त्यातला एक बदल म्हणजे प्राचीन भारतात विमानं आणि अणुबाँब होते. बात्रा यांना हव्या असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त सगळ्या गोष्टी वगळणं आणि त्या गोष्टी कुठंच प्रसिद्ध होता कामा नयेत अशी मोहीम त्यांनी सुरू केली. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून वेंडी रॉजर यांचं The Hindus. An Alternative History या पुस्तकावर बंदी…

Read More Read More

मुझूफ्फरनगरला गेलो होतो. दिल्लीहून मुझफ्फरनगरमधे जाणं हे एक  दिव्य असतं. अत्यंत घाण बसेस. सिटाही जागेवर  नसतात, टायरवर बसावं लागतं. रस्ते खराब. वाटेत नाना प्रकारची वाहनं उलट सुलट बाजूनं मनास वाटेल तशी फिरतात. परिणामी वाहतुक तुंबा. एका ठिकामी मी दोन तास अडकून पडलो होतो. त्या वेळी वाहनांच्या दंगलीमुळं धुळीचे लोट वाहत होते. ती धूळ आसपासच्या रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांवर बसत होती. धूळ आणि माशा यांच्यात स्पर्धा चालली होती. मुझफ्फरनगर आणि आसपासची गावंही अस्वच्छ आणि  साधनहीन दिसतात.   1980च्या  आसपास मी मेरठ आणि मुझफ्फऱनगरमधे चौधरी…

Read More Read More

रुवांडात हत्याकांड चाललं होतं. जगातला कोणताही देश ते थांबवायला पुढं येत नव्हता. युनोची पाच पन्नास निःशस्त्रं माणसं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती.त्या पैकी एक, त्याचं नाव एमबाये. डोक्यावर युनोची निळी टोपी. अंगावर निळं बुलेटप्रूफ जॅकेट. एकही शस्त्रं नाही. हा माणूस रक्ताळलेले सुरे आणि बंदूक घेतलेल्या माणसासमोर उभा राहून म्हणे की समोरच्या माणसाला उगाचच मारू नका. एका चर्चमधे तर तिथला पादरीच खुनी झाला होता. हातात कलाश्निकाव घेऊन तो चर्चमधे आश्रयाला आलेल्या निर्वासितांना मारत होता.एक स्त्री आश्रयाला आली. पादऱ्यानं तिच्यावर बंदूक उगारली….

Read More Read More

  अरूण शौरी, सोली सोराबजी, मेघनाद देसाई या तीन  विचारवंतांनी मोदींनी  राज्य ग्रहण केल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे ते सांगितलं आहे. भाजप-मोदींच राज्य येणार असं त्यांनी  गृहीत धरलं आहे. तीनही माणसं समतोल आहेत, टोकाची पक्षपाती नाहीत. एकादी गोष्ट त्यांना आवडली असली, पटली असली तरी ते त्या गोष्टीला बौद्धिक कसोट्या लावून, तोल सांभाळून विचार करतात.   मेघनाद देसाई म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लागलेली आहे. त्याला आधीचं सरकार कारण आहे. परंतू त्यांना शिव्या देत न बसता  अर्थव्यवस्था सुधारायची तर फार…

Read More Read More

रवांडा

रवांडा

रुवांडा या आफ्रिकन देशात वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ च्या एप्रिल महिन्यात हत्याकांड सुरु झालं. एक महिन्याभरात नऊ ते दहा लाख टुट्सी जमातीची माणसं मारली गेली. रुवांडाच्या अध्यक्षांचं विमान राजधानी किगालेमधे उतरत असताना उडवण्यात आलं आणि त्यात अध्यक्ष ठार झाले. अध्यक्ष हुटू या जमातीचे होते. हुटू आणि टुट्सी या जमातींमधे पूर्वापारपासून वैर होतं.  टुटसींनी आपल्या नेत्याला मारलं असं ठरवून हुटूनी हत्याकांड पार पाडलं.  महिनाभर हत्याकांड चालल होतं. तलवारी, सुरे, चाकू इत्यादी प्राथमिक शस्त्रं वापरून माणसं कापण्यात आली. काहीच हातात मिळाल नाही…

Read More Read More