मध्यंतरी महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉमवर मी गाझा हल्ल्यावर एक पोस्ट टाकली होती. तीच पोष्ट माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरही टाकली होती. माझ्या स्वतःच्या ब्लॉगला आलेल्या प्रतिक्रिया समतोल आणि सभ्य होत्या. महाराष्ट्र टाईम्सवर आलेल्या प्रतिक्रिया अगदीच असभ्य, विषयाला सोडून, द्वेषमूलक इत्यादी होत्या. त्यातल्या काही मुस्लीमद्वेषी आणि इसरायलप्रेमी होत्या. आणखी एक. प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी काही जणांना माझ्याबद्दल काही माहिती होती, त्यातून त्यांनी काही समजुती करून घेतल्या होत्या. त्यांच्या आधारे ते मला टोले मारत होते, विषयाशी संबंध नसतांना. उदा. गाझाचा विषय असताना मी लवासाचा म्हणजे शरद…
मलेशियन विमान क्षेपणास्त्रानं पाडलेलं आहे असं आतापर्यंतच्या पुराव्यावरून दिसतय. विमान पडलं ते ठिकाण रशिया युक्रेनच्या हद्दीवरचं आहे. युक्रेन आणि फुटीर बंडखोर यांच्यात लढाई चाललीय. फुटीर बंडखोर रशियन भाषा-संस्कृतीचे आहेत. युक्रेनची भाषा वेगळी आहे. पूर्व युक्रेनच्या लोकांना युक्रेनमधे रहायचं नाहीये. त्यांना रशियात जायचं आहे. त्यामुळं रशियाची बंडखोरांना सशस्त्र फूस आहे. सोवियेत युनियन कोसळल्यामुळं घटक राज्यं स्वतंत्र झालीत. ती राज्य पुन्हा काबीज करण्याची प्युतीन यांची इच्छा आहे. बंडखोरांजवळ रशियन शस्त्रं आहेत. युक्रेनकडं जुनी रशियन आणि कदाचित अमेरिकन शस्त्रं आहेत. एकमेकांची विमानं पाडणं…
इसरायलनं गाझावर रॉकेट हल्ले केले. २०० पेक्षा जास्त माणसं मारली. गाझातून इसरायलवर हल्ले होतात हे कारण सांगितलं. गाझातून झालेल्या हल्ल्यात इसरायलचा एकही माणूस मेलेला नाही. गाझात मेलेल्या माणसांत १७० पेक्षा अधिक स्त्रिया, मुलं आणि वृद्ध आहेत. इसरायल आणि पॅलेस्टाईन हे भांडण १९४७ साली इसरायलची निर्मिती झाली तेव्हांपासून. ज्यू लोक दोन तीन हजार सतत परागंदा अवस्थेत फिरत राहिली. ठिकठिकाणच्या राज्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावलं. या परागंदा अवस्थेत ज्यू समाजाचं मानस तयार झालं. आपल्याला आपली स्वतःची भूमी असावी असं ज्यूंचं मत होतं. आपण…
वैदिक प्रकरण वैदिक हे गृहस्थ पाकिस्तानात गेले होते. एका शिष्टमंडळाबरोबर. शिष्टमंडळासोबतचं जे काही काम होतं ते झाल्यावर ते स्वतंत्रपणे हफीझ सैद या दहशतवादी पाकिस्तानी माणसाला भेटले. मुंबई, काश्मीर इत्यादी ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधे त्यांचा हात होता. एकेकाळच्या लष्करे तैयबा आणि आताच्या जमात उद दवा या दशहतवादी संघटनेचे ते निर्माते आहेत. त्यांच्याशी वैदिक काही तरी बोलले. ते प्रसिद्ध झालं, त्या बद्दल वैदिक यांनी काहीही लिहिलेलं नाही ते फक्त प्रतिक्रियेच्या स्वरूपात माध्यमांसोर बोलत राहिले. ते जे काही बोलले ते क्षुल्लक होतं, निरर्थक…
पन्हा एकदा धर्म मुद्दा आहे धर्म आणि संस्कृती,धर्म आणि चालीरीती यांच्यातल्या नात्यांचा. पन्नास हजार ते एक लाख वर्षं हा धर्म, देव, श्रद्धा यांच्या निर्मितीचा काळ मानला जातो. सभोवतालचं वास्तव आणि माणसाचं जगणं-मरणं यातल्या अनेक गोष्टींचा खुलासा विज्ञान-तंत्रज्ञान-उपकरणं यांच्या नसण्यामुळं होत नव्हता. त्या त्या काळात लोकांनी देव, उपासना इत्यादी गोष्टी कल्पिल्या. माणसं काहीही खात होती. कोणालाही मारत होती. कोणाशीही शरीर संबंध ठेवत होती. शक्तीवान प्रबळ ठरत असे. काळ पुढं सरकल्यावर जगात नाना ठिकाणी नाना स्थितीनुसार देव, माणसांनी उपासना या गोष्टी समाज…
जिहादी आणि जैन सध्या एकाच वेळी घडणाऱ्या घटना. इराकमधे आयसिस या जिहादी संघटनेनं त्यानी मिळवलेल्या टीचभर प्रदेशात खलिफाची, म्हणजे प्रेषितांच्या प्रतिनिधीची, म्हणजे इस्लामची खिलाफत जाहीर केली आहे. ती साऱ्या जगात करायची त्यांची इच्छा आहे. या खिलाफतमधे स्त्रिया बुरख्यात वावरतील, त्याना घरात रहावं लागेल, समाजात मद्य नसेल, समाजात संगित-चित्रपट-नाटक इत्यादी नसेल. गुजरातेत पालिताणा नावाचा एक भाग आहे. तिथं जैनांची धार्मिक स्थळं आहेत. असा पालिताना पूर्ण मांसाहारमुक्त करायचं गुजरात सरकार ठरवतंय, त्याला सध्याच्या भारत सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता…
भविष्यातली संस्कृती शहरी संस्कृती असेल. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/entry/india-is-country-of-cities-not-villages
शहरं. आज जी काही आहेत त्यांची दुरवस्था आहे. जी काही नव्यानं होताहेत त्यांचीही दुरवस्था आहे. याचं एक कारण शहराचा कारभार हे आहे. न्यू यॉर्क, लंडन या शहरांना एक स्वतंत्र जबाबदार मेयर असतो. शहर कसं चालवायचं ते तो ठरवतो. ते ठरवण्याचा, नियोजन अमलात आणण्याचे अधिकार त्याला असतात. तसंच काही तरी भारतात व्हायला हवं. http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/entry/city-want-resposible-owner