Browsed by
Month: August 2014

कोकण रेलवेनं दगा दिल्यावर प्रवाशांची तारांबळ उडाली. कित्येक तासांची रखडपट्टी, पुन्हा गाडी केव्हां सुटेल आणि केव्हां पोचेल याची खात्री नाही. घरून सामान बोचकी घेऊन निघालेले. सोबत पोरंबाळं. इतर काही वाहन मिळवण्याची जीवघेणी खटपट. त्याचा फायदा बसवाल्यांनी घेतला. तीन चारशे रुपयांच्या जागी पंधराशे रुपये बसवाल्यानी घेतले. मुंबई गोवा बसेसमधे चार हजार रुपये घेण्यात आले मग तुम्ही कणकवलीला उतरा नाही तर कुडाळला. हे वागणं क्रिमिनल आहे. कोणत्या कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते? मागणी आणि पुरवठा या आर्थिक न्यायाला अनुसरून तिकीटाच्या किमती वाढवण्यात…

Read More Read More

कर्नाटकातल्या भटकळ गावात जन्मलेला सुलतान अब्दुल कादिर आरमार गेले काही दिवस अन्सार उल तौहिद या वेबसाईटवर दिसत होता.( अब्दुल कादीरचं शिक्षण लखनऊच्या दारुल उलूम या धर्मीशाळेत झालेल आहे.) वेबसाईटवरून त्यानं भारतातल्या मुसलमान तरुणाना आवाहन करून जिहादमधे भाग घ्यायला बोलावलं. अफगाणिस्तानात या, तिथं प्रशिक्षण घ्या आणि सीरियातल्या जिहादमधे भाग घ्या असं त्यानं सांगितलं. सीरियातलं असद यांचं सरकार धर्मभ्रष्ट असल्यानं त्या िवरोधात लढणाऱ्या ISIS या जिहादी संघटनेत या असंही तो म्हणाला. त्या बरोबरच भारतातले गाईची पूजा करणारे, ब्राह्मण, इस्लामी नसलेले, अश्रद्ध इत्यादींचाही…

Read More Read More

vying for allah vote

vying for allah vote

एक पुस्तक नुकतंच वाचलं. vying for alla’s vote. पाकिस्तानच्या राजकारणाचा अभ्यास करणारं.  जिथं धार्मिक माणसं जास्त असतात तिथले राजकीय पक्ष धर्माचा वापर, धार्मिक मूल्यं आणि प्रतिकं यांचा वापर मतं मिळवण्यासाठी करतात. ते आजवरचा इतिहास पहाता अटळ दिसतं. परंतू असा वापर अतिरेकी-दहशतवादी संघटनांना जन्म आणि अन्नपाणी देऊ शकतो हे पाकिस्तानात सिद्ध होत आहे. पाकिस्तान आज एका विभाजक रेषेवर उभा आहे. दहशतवादी विचार आणि संघटना देशाचा आणि समाजाचा ताबा घेऊन लोकशाही-मोकळेपणा संपवू शकतात. किंवा लोकशाही आणि आर्थिक गरजा यांचा परिणाम म्हणून अतिरेकी…

Read More Read More

नटवरसिंग

नटवरसिंग

आत्मकथनांमधून सार्वजनिक संस्थांची प्रकृती समजायला मदत होते. नटवर सिंग यांचं one life is not enough हे आत्मकथन प्रसिद्ध झालंय. नटवरसिंग पूर्वी परदेश मंत्री होते. इराकबरोबर तेलाच्या बदल्यात अन्न व्यवहार प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. नंतर ते पक्षाच्याही बाहेर पडले. गेली काही वर्षं ते राजकीय विजनवासात आहेत. आत्मकथन  प्रसिद्ध होणार असं कळल्यावर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी नटवरसिगांना जाऊन भेटल्या आणि प्रसिद्ध करू नका अशी विनंती केली असं म्हणतात. त्यांना सुगावा लागला होता की त्यांचे उल्लेख कथनात…

Read More Read More

शहरं निर्माण करून माळीण दुर्घटना टाळण शक्य आहे. माळीण गाव निखळलेले दगड आणि माती यांच्याखाली गाडलं गेलं. गाव डोंगराच्या उतारावर वसलेलं होतं.  सह्याद्री प्रदेश डोंगरी आहे. डोंगर जांभा या ठिसूळ आणि सच्छिद्र दगडांचे आहेत. त्यात पाणी साठतं, भेगा पडतात. हवापाण्याचा परिणाम होतो, दगड तुटतात, माती होते, दगडमाती कोसळतात. कित्येक शतकं म्हणा, कित्येक सहस्रकं म्हणा ही प्रक्रिया घडते आहे. डोंगरात पाणी साठवलं, डोंगर कापून जमीन तयार केली की दगड मोकळे होऊन निसटण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होते. सह्याद्री प्रदेश डोंगराळ असल्यानं इथे…

Read More Read More