मोदींनी न्यू यॉर्कच्या मुक्कामात अकरा पत्रकारांना ऑफ रेकॉर्ड म्हणजे अनौपचारिक किंवा अनधिकृत गप्पा करण्यासाठी बोलावलं. येतांना पेन, कागद, टेप रेकॉर्डर, कॅमेरा, सेल फोन वगैरे काहीही आणायला परवानगी नव्हती. मोदींशी जे काही बोललं जाईल त्याचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड नसेल. म्हणजे पत्रकारांच्या बाजूनं नोद नसेल. मोदींच्या पोलिस यंत्रणेनं नोंद ठेवली आहे की नाही ते कुठं मोदींनी सांगितलं? गप्पा ज्या ठिकाणी झाल्या ठिकाणी सूक्ष्म नोंदक कशावरून ठेवलेले नसतील? पत्रकाराना बोलावतांना त्याची खात्री मोदींनी दिलेली नव्हती. त्यामुळं झालेल्या बैठकीचा कदाचित एकतरफी रेकॉर्ड रहाणार. पत्रकार…
राजकारणासाठी धर्माचा वापर
भारतीयांनी हॅपी बर्थ डे असं म्हणून मेणबत्त्या फुंकणं बंद करावं आणि त्या ऐवजी दिवा, पणती, निरांजन, समई वगैरे लावावी असं दिनानाथ बात्रा यांचं म्हणणं आहे. या किंवा कोणत्याही समारंभात स्वदेशी कपडे ( म्हणजे?) घालून होम हवन करावं, गायत्री मंत्र म्हणावेत असं ते सुचवतात, तसं सांगणारी पुस्तकं लिहितात. सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश म्हणाले की मी जर हुकूमशहा झालो तर गीता आणि महाभारत भारतात अनिवार्य करीन. गायत्री मंत्र, होम हवन या धार्मिक गोष्टी आहेत. दिवा पणती लावणं ही सांस्कृतीक गोष्ट आहे. गीता…
पाकिस्तानातली भारताबद्दलची भीती आणि द्वेष
दुकानांत आणि व्हर्चुअल जगात सध्या पाकिस्तान या विषयावर खूप पुस्तकं येताहेत. पाकिस्तानातले दुतावास, अमेरिकेतले पाकिस्तानी दूतावास, पाकिस्तानातलं सरकार, अमेरिकेचं परदेश खातं यांत काम केलेली माणसं पुस्तकं लिहित आहेत. पत्रकारी किंवा संशोधक अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानात फिरलेले, वाचन केलेली लोकं पुस्तकं लिहीत आहेत. पाकिस्तानात घडलेल्या घटना त्यातून बाहेर येत आहेत. घटना, माहिती लपून होती कारण पाकिस्तानातलं दहशती वातावरण. माणसं बोलायला धजावत नसत, जीव जाण्याची भीती. नाना प्रकारची माहिती सरकारच्या फायलीत अडकलेली होती. त्या माहितीपर्यंत जाणं पाकिस्तानातल्या वातावरणामुळं शक्य नव्हतं. आता आता तो…
भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?
गणपती गेले. आता देव्या येतील. गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले. नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल. गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा…
इस्लामी स्टेट नष्ट करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
इस्लामी स्टेट या संघटनेचा नायनाट करायचं अमेरिकेनं ठरवलंय. ते योग्य दिसतय. आज घडीला इस्लामी स्टेट या दहशतवादी क्रूर संघटनेला पायबंद घालण्याचा दुसरा मार्ग दिसत नाहीये. इस्लामिक स्टेट – इस्लामी राज्य (इरा) ही संघटना खलास करण्यासाठी अमेरिकेनं जगातल्या पंधराएक देशांचं एक गाठोडं बांधलं आहे. इराचा धोका या कापडात पंधरावीस वस्तू बांधण्यात आल्या आहेत. अमेरिका आपलं सैन्य इराक-सिरियात उतरवणार नाही. ड्रोन प्रणाली, शस्त्रं आणि पैसा या तीन वाटांनी अमेरिका इराविरोधी कारवाईत भाग घेईल. इतर देशांनी पैसे आणि सैनिक या मोहिमेत गुंतवावेत अशी…
आमदार म्हणजे मतांचे कंत्राटदार
गाबीत, पाचपुते इत्यादी मंडळी भाजपत दाखल झाली. सर्वांवर भ्रष्टाचाराचे, बेकायदेशीर वर्तनाचे आरोप. त्या आधी मेटे दाखल झाले. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप. एका पक्षातील लोक दुसऱ्या पक्षात जाणं ही गोष्ट राजकारणात नेहमी घडत असते. आधीच्या पक्षात अडचण झालेली असते आणि नव्या पक्षांना अडचणीतून वाट काढायची असते. तेव्हां दोन्ही बाजूंनी अडचणींचा मामला. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी एक म्हण आहे. हरीलाही गाढवाचे पाय धरावे लागतात तर मातीचे पाय असणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत आक्षेप कसा घेणार. महाराष्ट्रात भाजपला बाहेरून माणसं आयात…
फॉयल
दुकानं बंद, नेटवर पुस्तकांची खरेदी अमेरिकेत फिरणाऱ्या माणसाचा एक सुखद अनुभव म्हणजे बार्नस अँड नोबल पुस्तकाच्या दुकानात फेरी मारणं. न्यू यॉर्क, शिकागो, कोलंबस,कुठंही ही दुकानं असतात. तीन चार मजल्यांची. हज्जारो चौरसफुटांची जागा आणि त्यात किती तरी म्हणजे किती तरी पुस्तकं. निवांतीनं पुस्तकं चाळत,वाचत बसायचं. सोबतीला कॉफी, केक्स, ब्राऊनी वगैरे. साहित्य, चित्रपट, नाटक, चित्रकला,विज्ञान, तंत्रज्ञान,बाल साहित्य, लिबरल आर्टस असे आणि किती तरी विषय. झटकन वाचता येणाऱ्यापासून ते पीएचडी वगैरेत गुंतलेल्यांना उपयोगी पडावीत अशी पुस्तकं. असं हे बार्नस अँड नोबल आता…
सेटलॉफ
सेटलॉफ हा आयसिसनं शिरच्छेद केलेला दुसरा पत्रकार. हाणामाऱ्या चाललेल्या ठिकाणी जाऊऩ पत्रकारी करण्याचा बराच अनुभव त्याच्या गाठीशी. सीरियात यादवी सुरू झाल्यापासून तो तिथं होता.त्या आधी तो लिबियात होता, इजिप्तमधे होता आणि अल कायदाचा पक्का अड्डा असलेल्या येमेनमधे होता. पर्वतांवर जाणारी माणसांना बर्फाची, विरळ हवामानाची सवय असते, वादळं आणि लहरी हवामानाची सवय असते. सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची सामग्री घेऊन आणि मुख्य म्हणजे वाटाडे घेऊन ते पर्वतात पोचतात. सेटलॉफ हा अशाच संकटांत शिरणाऱ्यांपैकी एक. 1 ऑगस्ट 2013 रोजी तो सीरिया-तुर्कस्तानच्या सीमेपासून…
फॉयल
जेम्स फॉयल या अमेरिकन छायापत्रकाराचा शिरच्छेद आयसिस या दहशतवादी संघटनेच्या माणसानं इराकमधे केला. जेम्स फॉयल २०१२ पासून सीरियात होता. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. कोणी म्हणतं की असदच्या लोकांनी त्याला पकडलं होतं, कोणी म्हणतं की आयसिसनं पकडलं होतं. अमेरिकेनं जंग जंग पछाडलं पण त्याचा पत्ताही लागू शकला नव्हता. अचानक त्याच्या शिरच्छेदाची व्हिडियो क्लिप दाखवण्यात आली तेव्हां त्याचा पत्ता लागला. ब्रिटीश घाटणीचं बोलणाऱ्यानं शिरच्छेद केला होता. अमेरिकेनं इराकमधे आयसिसवर हवाई हल्ले केल्याचा निषेध आणि इशारा म्हणून हा उद्योग आयसिसनं…