शहरं आखायला हवीत.
श्रीनगरमधे पाऊस संकटासारखा कोसळला. पाणीच पाणी साचलं. सारं श्रीनगर एक सरोवर झालं होतं. नॉर्मल वेळी आपण रस्त्यावर उभे रहातो, कठड्याला टेकून, पलिकडं दल सरोवर असतं. कठड्यावरून उडी मारून खाली उभ्या असलेल्या छोट्या होडक्यात बसायचं आणि दलच्या किनाऱ्याला पार्क केलेल्या हाऊस बोटीत जायचं. हे झालं नेहमीचं. २०१४ च्या पावसाळ्यात दल सरोवर आणि रस्ता यात फरकच राहिला नाही. सरोवर कुठलं आणि शहर कुठलं ते कळत नव्हतं. सगळं शहर पाण्याखाली. इमारतींचा पहिला मजला पाण्याखाली. माणसं दुसऱ्या मजल्यावर आणि गच्चीत मुक्काम करून राहिली. कित्येक…