एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.
एलिझाबेथ एकादशी. एलिझाबेथ खरंच टिकाऊ आहे. खूप टिकेल. खूप लक्षात राहील. कित्येक वर्षात इतका सुंदर मराठी चित्रपट पहायला मिळाला नव्हता. पंढरपुरातली चार पाच छोटी मुलं. प्रत्येकाचं घर वेगळं, घरची माणसं वेगळी. प्रत्येकाच्या घरच्या समस्या वेगळ्या. मुलं आपलं लहानपण पुरेपूर जगत असताना आपल्या घरचा भार उचलण्याच्या खटपटीत. खट्याळ, वांड, अभ्यास करणारी आणि अभ्यास न आवडणारी मुलं. आपलं लहानपण जगत असतानाही मोठ्या माणसासारखी वागायचा प्रयत्न करणारी. मोठी माणसं जशी नसतात पण असायला हवीत तसं वागणारी. चित्रपट पंढरपूरच्या गर्दीत घेतला आहे. तिथली घरं,…