शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.
शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या. गेलं वर्षंच नव्हे तर दशक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चिंतित आहे. हज्जारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काही सुखासुखी घडत नाहीये. शेती करणं, त्यासाठी घेतलेली कर्जं न फिटणं, फायदा न निघणं यातूनच आत्महत्या होताहेत. शेती तोट्यात आहे या एका वाक्यात आत्महत्येचं कारण सांगता येईल. सरकार खतांवर सबसिडी देतेय. वीज आणि पाणी कमी किमतीत देतंय. शेतीतली काही उत्पादनं हमी भाव देऊन खरेदी करतंय. येवढं सारं करूनही शेतकऱ्याला त्याचा खर्च भागवून चार पैसे उरतील अशा रीतीनं शेती करता येत नाहीये….