शार्ले हेबडो
७ जानेवारी २०१५ रोजी तीन जण एके सत्तेचाळीस घेऊन पॅरिसच्या शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसले. आतमधे संपादकीय बैठक चालली होती. बैठकीतल्या माणसांना ओळखून, त्यांची नावं घेऊन बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. १२ पत्रकारांना ठार मारलं. मारेकरी होते शेरीफ आणि सईद क्वाची, भाऊ भाऊ. एकानं कारवाईच्या आधी एक व्हिडियो क्लिप पाठवली होती. आपण इराकमधल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचे आहोत असं तो त्या क्लिपमधे म्हणाला. दुसऱ्यानं पोलिसांच्या गोळ्यांना बळी जाण्याआधी गर्वानं सांगितलं की त्याला येमेनमधल्या अल कायदाच्या शाखेनं या कारवाईसाठी धाडलं होतं. अल…