Browsed by
Month: February 2015

पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

पटेल यांना अलाबामातल्या मॅडिसन शहरात पोलिसांनी दुखापत केली.

गुजरातमधील पिंज या गावचे श्री पटेल. इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता येत नाही. त्यांचा मुलगा अमेरिकेतील अलाबामा राज्यातल्या मॅडिसन या गावात रहातो. मॅडिसन या तीस चाळीस हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे एक हजार भारतीय रहातात. अमेरिकन नसलेले इतरही लोक या गावात रहातात. पटेलांचा मुलगा अमेरिकेत शिकतोय, नोकरी करतोय. त्याला दीड वर्षाचं मूल आहे. मूल सांभाळण्यासाठी पटेल मॅडिसनमधे गेले, त्यांची पत्नी गुजरातेतच राहिली. एके सकाळी सहा वाजता पटेल हिंडायला बाहेर पडले. पटेल रस्त्याच्या कडेला असलेल्या पायवाटेनं फिरत होते. ते पाहून आसपासच्या घरातल्या एका रहिवाशानं…

Read More Read More

स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

स्वयंपाक घरातला आर्किटेक्ट

         रविवारची सकाळ. दारावरची घंटी वाजचे आणि शेजारचे जोशी दारात उभे. लांबलचक दाढी. डोक्यावर केस नाहीत. गळ्यात गमछा. हातात वाडगा.          “दामले. हे घ्या.”          सुहास जोशी आर्किटेक्ट आहेत. स्वच्छंदी. जे आवडेल ते करतात. त्यात तुडुंब आनंद मिळवतात. मुंबईतल्या पृथ्वी थेटरमधे एक कॅफे आहे. तिथं जवळ जवळ दररोज संध्याकाळी जाऊन बासरी वाजवत बसतात. तबला आणि तंबोऱ्याची साथ त्यांचं आय पॅड करतं. कधी खांद्यावरच्या पिशवीतून पॅड काढतील आणि समोरच्या माणसाचं स्केच काढतील. आणि रविवारी किवा कधीही सकाळी किवा…

Read More Read More

मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री

मोदी, ओबामा, पर्सनल केमेस्ट्री

नरेंद्र मोदींनी बराक ओबामांना मिठ्या मारल्या. ओबामांसोबत जाहीर बोलताना मोदी ओबामांचा उल्लेख बराक बराक असा करत होते. ओबामांशी आपली जवळीक आहे आपण ओबामा यांच्यात एक पर्सनल केमेस्ट्री आहे असं मोदी दाखवत होते.  देशाचे प्रमुख म्हणून कामासाठी, करार करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रपती-पंतप्रधान ही  माणसं एकत्र येतात तेव्हांही ती देशप्रमुख असली तरी मुळात माणसंच असतात.  या माणसांचं आपसात किती जुळतं, भेटीमधे त्यांच्यात किती आपुलकी निर्माण होते, माणसं म्हणून ती एकमेकाच्या किती जवळ येतात याला महत्व असतं. शिखरावरच्या  एकट्या पडलेल्या माणसांचं आपसातलं सूत…

Read More Read More

पुस्तकांची दुनिया

पुस्तकांची दुनिया

मुंबईतला फ्लोरा फाऊंटनचा फूटपाथ. हुतात्मा चौकातल्या हुतात्मा स्मारकाच्या समोरचा कोपरा. इंग्रजी यू आकाराचा फूटपाथ. पाठीमागं इमारतीच्या कंपाउंडच्या लोखंडी सळयांच आणि डोक्यावर ताडपत्रीचं कायम तात्पुरतं छप्पर. फूटपाथवरच पुस्तकावर पुस्तक, त्यावर पुस्तक रचत तीन फूट, चार फूट, पाच फूट उंचीच्या पुस्तकभिंती.   तीन चार दुकानं. भिंतीच नसल्यानं एका दुकानापासून दुसरं दुकान वेगळं ठरवणं कठीण. मालकांनाच ओळखता येतंच आपलं दुकान.  मोजदाद अवघड पण दोन तीन लाख पुस्तकं असावीत असा दुकानदारांचा अंदाज.   १९६० सालाच्या सुमाराला इथं  एकच दुकान होतं. आताच्या दुकानांपेक्षा लहान. मालकाचं नाव…

Read More Read More

केजरीवाल

केजरीवाल

दिल्लीत आम आदमी पार्टी एक नंबरवर निवडून आली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हरवून. देशभर एक उत्साहाची लाट उसळली.   आप आणि केजरीवाल हे अण्णा आंदोलनाचे फुटवे होते. अण्णा हजारेनी   केजरीवालना  निवडणूक लढू नका असं सांगितलं होतं. अण्णांचाही गोंधळ होता. एकदा ते केजरीवालना आशिर्वाद देणार म्हणाले एकदा त्याना पाठिंबा देणार नाही म्हणाले. केजरीवालांचं म्हणणं होतं की देशातली व्यवस्था भ्रष्ट असेल तर ती दुरुस्त करणं ही  आपली जबाबदारी  आहे. त्यासाठी  भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानं एक राजकीय पक्ष स्थापून निवडणुक लढवायला…

Read More Read More

गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

गांधीजींना शांततेचं नोबेल कां मिळालं नाही.

१९७४ साली नोबेल कमिटीनं मदर तेरेसा यांना शांततेचं नोबेल पारितोषिक नाकारलं.  कारण? मदर तेरेसांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावं असं  भारतीय  खासदारानी नोबेल कमीटीला १९७४ साली लिहिलं होतं. शांततेचं नोबल अमूक एका माणसाला द्या अशी विनंती कोणीही करू शकतो.  संसदेतले लोक, अगदी नगरपालिका, जिल्हा परिषदेचेही लोक तशी विनंती करू शकतात. ब्रीटनमधले भारताचे राजदूत बीके नेहरू यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना लिहिलं की त्यांनी नोबेल कमिटीला मदर तेरेसांना नोबेल द्यावं असं  लिहिलं तर त्याचा उपयोग होईल. इंदिरा गांधी विचार करत होत्या. मधल्या…

Read More Read More