एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा
एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पंढरपूर या गावातल्या एका कुटुंबाच्या जगण्यातले काही दिवस या चित्रपटात आहेत. मध्यम वर्गीय कुटुंब. कुटुंबातला कर्ता माणूस वारला आहे. त्याची पत्नी, आई आणि त्याची दोन मुलं. मुलांची आई स्वेटर विणून, स्वयंपाकाची कामं करून घर चालवते, मुलांना वाढवते. मुलाच्या दिवंगत वडिलानी हौसेनं डिझाईन केलेली एक सायकल आहे. मुलगा ती जिवापाड जपतो. मोठा झाल्यावर, उंची वाढल्यावर, त्याला ती वापरायची आहे. लोकांकडून कामाचे पैसे न आल्यानं आईचं स्वेटर विणायचं गहाण यंत्रं बँक जप्त करायला…