Browsed by
Month: May 2015

मोदींचं एक वर्ष. गडगडाट. पाऊस पडत नाहिये.

मोदींचं एक वर्ष. गडगडाट. पाऊस पडत नाहिये.

नरेंद्र मोदींनी एक वर्षापूर्वी केलेल्या झंझावाती प्रचार मोहिमेनं त्यांना लोकसभेत निर्णायक बहुमत दिलं. अच्छे दिन आणण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलं. प्रचार मोहिम दुपेडी होती. काँग्रेसची नालायकी आणि देशाला सुख देण्याचं ( अच्छे दिन )  आश्वासन. काँग्रेसच्या  नालायकीचे खूप तपशील मोदींनी दिले. सुखाची बाजू सांगताना तपशील न देता सारं काही ठीक करू असं मोघम सांगितलं. आज मोदींचं सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटलं आहे. मोदी परदेशात आणि देशात भाषणं करत फिरत आहेत. अजूनही ते प्रचार मोहिमेत असल्यासारखे वाटतात, निवडून आलेले नेते…

Read More Read More

खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

खडसे, गडकरी यांचे मूत्रविषयक विचार

  नितीन गडकरी हे भाजपचे वाहतुक मंत्री मानवी मूत्र या विषयावर बोलले. ते म्हणाले की शहरातल्या मॉलमधे गोळा होणारं मूत्र गोळा करून त्याचा उपयोग खतं तयार करण्यासाठी करता येईल, तसा विचार सरकार करत आहे. गडकरी नागपुरच्या आपल्या रहात्या घरात मूत्र गोळा करतात आणि झाडांना घालतात. महाराष्ट्रातले भाजपचे मंत्री एकनाथ खडसेंनी गडकरींना दुजोरा दिला, अहमदनगरच्या कृषी विद्यापीठामधे या विषयावर संशोधन केलं आहे असं त्यांनी सांगितलं. ( असं संशोधन झालेलं नाही असं कृषी विद्यापीठाच्या जबाबदार अधिकाऱ्यानं सांगितलं.)  दोघांच्या या विधानांवर माध्यमात धमाल चर्चा…

Read More Read More

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराचीमधे बसमधून चाललेल्या इस्माइली पंथाच्या लोकांवर सहा जणांनी गोळीबार केला. त्यात ४९ व्यक्ती मारल्या गेल्या, वीसपेक्षा जास्त जखमी झाल्या. मृतांत स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं होती. हल्ला नियोजित होता. इस्माइली माणसं अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी बसमधून अमूक वेळी जाणार आहेत हे हल्लेखोरांना माहित होतं. हल्लेखोर तीन बाईक्सवरून आले आणि बसवर दोन बाजूंनी हल्ला केला. काही मिनिटं ही घटना घडली. हल्लेखोर पळून गेले.  सुरवातीला जुंदाल्ला या संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्विकारली. जुंदाल्ला ही संघटना तहरिके तालिबान या पाकिस्तानी तालिबान या छत्री संघटनेचा…

Read More Read More

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

कायदा या कल्पनेवर भारताचा विश्वास नाही. कायद्याला अनेक पर्याय भारतीय जनतेनं शोधले आहेत. कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो. सलमान खान खटल्याची सुरवात अशी झाली. २८ सप्टेंबर २००२ च्या  मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फूटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमधे ही घटना लोकांना पहायला मिळाली. ३० तारखेच्या पेपरात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं.  त्या वेळी निखील वागळे…

Read More Read More

माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

नऊ  मे या दिवशी जगभर अनेक संघटना आणि माणसं  मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाच्या रोगाशी झुंज देण्याचा निर्धार करत असतात.  मल्टिपल स्क्लेरॉसिस. माणसाच्या मज्जातंतूवरचं आवरण नष्ट होण्यानं निर्माण होणारी व्याधी. माणसाच्या शरिरातील मज्जातंतू शरीरभर संदेश वहन करत असतात. मेंदूपासून विविध स्नायूंपर्यंत. स्नायूंपासून मेंदूपर्यंत.  माणसाच्या डोळ्याला टेबलावरचा चहाचा कप दिसतो. त्याच्या नाकाला चहाचा वास येतो. नाक आणि डोळे त्यांची संवेदना मेंदूला कळवतात. माणसानं आधी कित्येक वेळा चहा प्यालेला असल्यानं चहाची चव आणि वास मेंदूनं साठवलेला असतो.  आवडीचा आणि परिचयाचा असल्यानं  हा चहा प्यायला…

Read More Read More

कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

 एका लोकशाहिराचा सरकारनं केलेला छळ ही कोर्ट सिनेमाची गोष्ट आहे.  आंबेडकरवादी कार्यकर्ता गरीब-कामगारांचं प्रबोधन करत असतो. शाहिरीतून. सरकार त्याच्यावर खटला भरतं. एक गटारात काम करणारा कामगार मरण पावलेला असतो. ते मरण नैसर्गिक नसून ती लोकशाहिराच्या चिथावणीमुळं केलेली आत्महत्या होती असं सरकार ठरवतं. लोकशाहिरावर खटला भरतं. खिशात पैसे नसलेल्या लोकशाहिराचे सरकार आणि न्यायव्यवस्था कसे हाल करते याचं कथन या सिनेमात आहे. देशातली न्यायव्यवस्था आणि राज्यव्यवस्था येव्हांना समजलेली आहे. न्याय व्यवस्थेत न्याय मिळणं हा केवळ एक अपघात असतो, एक चान्स असतो हेही…

Read More Read More