मॅगी… मॅगी
गंधर्व चौकातली साई निवास इमारत. तीन मजली. इमारतीच्या तळाशी फूटपाथवर नूडल्सवाली गाडी. गाडीपाशी वर्दळ. ‘ दो प्लेट मॅगी ‘… ‘ एक प्लेट मॅगी ‘ … ‘ एक प्लेट मॅगी ‘… गाडीला तीनही बाजूनी लोकांनी घेरलं होतं. गाडीवाला मोठ्या कढईत नूडल्स ढवळत होता. मधे मधे चिरलेला कांदा, गाजर आणि ढोबळी मिरची कढईत सोडत होता, ढवळत होता. ‘ दो मिनिट रुको. अभी तय्यार होगा.’ गाडीवाला गिऱ्हाइकांना थोपवून धरत होता. फूटपाथवर वाटसरूंची वर्दळ होती. गाडीच्या भोवती नूडल्स खाणाऱ्यांचा गोतावळा वाटसरूना अडथळा करत…