याकूबची फाशी. एक गोंधळ.
याकूब मेमनची फाशी पार पडली. त्याच्या शरीराचं दफन पार पडलं. ३० जुलैच्या सकाळी सात वाजायच्या आत फाशी व्हायची होती आणि ३० जुलैच्याच पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालय शिक्षेच्या कायदेशीर प्रोसिजरची चर्चा करत होतं. खटल्याची सुनावणी नीट झाली नाही, शिक्षा झाल्याचं आरोपीला आधी कळवलं नाही या मुद्द्यावर फाशी पुढं जाऊ शकत होती. तिकडं नागपूरच्ला तुरुंगाधिकारी फाशीचा दोर ठीकठाक आहे ना याची शहानिशा करत होते, याकुबला पहाटे उठवायची तयारी करत होते, सर्वोच्च न्यायालयातल्या निकालाची वाट पहात जागत होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फॅक्सनं…