शिवचरित्र, बाबासाहेब पुरंदरे, सरकारी पुरस्कार आणि भंकस वाद
महाराष्ट्र भूषण प्रकरणाचे कंगोरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिव चरित्र लिहिलं. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या शैलीत शिवचरित्र सांगितलं. शिवचरित्राचं नाटक किंवा इवेंट या रुपात ‘जाणता राजा’ सादर केला. शिवाजी मांडताना त्यांनी इतिहासाचा आधार घेतला. त्यासाठी अकॅडमिक इतिहास, बखरी, आठवणी, पोवाडे, स्तोत्र, काव्यं इत्यादी साधनं अभ्यासली. बाबासाहेब पुरंदरे शिवाजीच्या प्रेमात होते. शिवाजीचं महात्म्य लोकांसमोर मांडायचा ध्यास त्याना होता. शिवाजीचा येवढा प्रभाव त्यांच्यावर होता की दैनंदिन जगण्यातही ते मुजरा करत, रोजमर्रा घटनांमधेही शिवाजीचे दाखले देत. कोणाही व्यक्तीबद्दल सामान्यतः पन्नास ओळींपुरतीच माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचते….