बियांना राजयोग शिकवणारी शेती आणि दधिची यांची मेटॅलर्जी
महाराष्ट्रातलं शेती खातं काय करतंय? शेती मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑरगॅनिक शेतीच्या आक्रमक प्रसाराचा मसुदा सरकार तयार करत आहे. सरकारला शेतीवरचं रासायनिक घटकांचं आक्रमण पूर्णपणे संपवून शेती पूर्णपणे नैसर्गिक करायची आहे. शेतीतली रसायनं काढून टाकली की भाकड जनावरंही केवळ मलमुत्रासाठी वाढवता येतील आणि जनावरांच्या मलमूत्रांचा (मुख्यतः गाई-बैलांच्या) वापर नैसर्गिक-ऑरगॅनिक शेतीसाठी करायचा असा सरकारचा विचार आहे. अशा ऑरगॅनिक शेतीचा आक्रमक प्रसार करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. ऑरगॅनिक फार्मिंग म्हणजे काय? बी पेरल्यापासून पीक येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया बाहेरचं कोणतंही उद्योगात तयार…