शांतता नोबेलची वेगळी वाट
२०१६ च्या नोबेल शांतता पारितोषिकाच्या रांगेत पोप, अँगेला मर्केल आणि इराणचा न्युक्लियर कार्यक्रम थांबवणारे मुत्सद्दी उभे होते. पोपनी जगभरचे गरीब आणि वादळात सापडलेल्या १.२ अब्ज कॅथलिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मर्केल यांनी लाखो असहाय्य अरब निर्वासितांना आपल्या देशात वसवायचं आश्वासन दिलं. इराणला अणुबाँब पासून दूर नेलं अमेरिकन-इराणी मुत्सद्द्यांनी. या साऱ्यांना दूर सारून अगदीच अनपेक्षित ‘ट्युनीशियन राष्ट्रीय संवाद चौकडी’ ला देण्यात आलं. या चौकडीत जनरल ट्रेड युनियन, मानवी अधिकार संघटना, वकील संघटना आणि उद्योगी संघटनांची परिषद यांचा समावेश आहे. या…