भारतीय पैसा परदेशात जातो परदेशातला पैसा भारतात यायला नाराज. कां?
भारताची शेती व्यवस्था चांगली नसल्यानं भारतात पैसे गुतवतांना अमळ विचार करावा, काळजी घ्यावी असं मत चार्ल्स स्लॅब या संस्थेनं नोंदवलं आहे. ही संस्था जगभरच्या गुंतवणुकदारांना सल्ला देत असते. चार्ल्स स्लॅबचं निरीक्षण नवं नाही. गेली वीसेक वर्षं भारतातलं शेतीचं उत्पन्न घसरत चाललं आहे. भारतातले जमीन विषयक कायदे, शेतमालाच्या किमतींचं आणि व्यवहाराचं नियंत्रण करणारे कायदे, एकूणच शेतकरी विषयक कायदे शेतीला मारक ठरले आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांकडं एक हेक्टर जमीन. वीज व पाण्याची खात्री नाही. अशा स्थितीत एका हेक्टरातून निघणार काय? ना शेतकऱ्याला फायदा…