अशी पुस्तकांची दुकानं
पुस्तकांची दुकानं ।। न्यू यॉर्कमधे ५९ व्या स्ट्रीटवर एक सहा मजली इमारत आहे. विटांची, खूपच जुनी, विटांची. इमारतीच्या शेजारी आधुनीक गगनचुंबी इमारती आहेत. त्यांची दर्शनी बाजू काचांनी मढवलेली. ही तुलनेनं बुटकी इमारत विटांची आणि जुन्या खिडक्यांची. या इमारतीत तळाला एक बार आहे आणि एक लँपशेड्सचं दुकान आहे. या इमारतीत आर्गझी नावाचं जुन्या पुस्तकांचं दुकान आहे. १९५३ मधे लू कोहेन या माणसानं ही इमारत विकत घेतली, त्यात हे दुकान उघडलं. आर्गझीमधे जुनी, दुर्मीळ, लेखकाची सही असलेली, देखणी, इत्यादी पुस्तकं आहेत. त्या…