वाचकांना पुस्तकांकडं नेणारा आणि पुस्तकांना वाचकांकडं नेणारा राम अडवाणी
राम अडवाणी बुक सेलर (लखनौ, १९५२) या दुकानाचं आता काय होईल? दुकानाचे मालक राम अडवाणी वयाच्या ९५ व्या वर्षी परवा वारले. त्यांचा मुलगा रानीखेतमधे असतो, नात लंडनमधे असते. ते राम अडवाणी पुस्तक दुकान पुढं चालवणार? समजा त्यांच्या मुलानं आणि नातीनं ते चालवायचं ठरवलं किंवा कोणी ते विकत घेतलं तरी ते ‘ राम अडवाणींचं पुस्तकांचं दुकान ‘ रहाणार? राम अडवाणी यांचं पुस्तकांचं दुकान ही लखनौच्या संस्कृतीची एक लक्षणीय ओळख आहे. राम अडवाणी मुळातले पाकिस्तानातले. फाळणीनंतर भारतात आले. पाकिस्तानात त्यांचं पुस्तकाचं दुकान…