एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक
एकांतकोठडीतल्या कैद्यांचं वेबदैनिक ७९ वर्षाचे जेम्स रिजवे दर रोज सकाळी वॉकर रेटत वॉशिंगटनमधल्या आपल्या घरातून िनघतात आणि पोष्टात जातात. आताशा त्यांना वॉकर घेऊन येवढं चालणंही कष्टाचं असतं. दररोज सुमारे ५० पत्रं त्यांच्या नावे येतात. घरी परतल्यावर दिवसभर ते पत्र संपादित करतात. सॉलिटरी वॉच या त्यांनीच निर्माण केलेल्या वेबसाईटचा एक कर्मचारी येतो. पत्रांचा गठ्ठा घेऊन जातो. ‘सॉलिटरी वॉच’ या वेब दैनिकात तुरुंगात एकांतवासात खिचपत पडलेल्या माणसांची पत्रं आणि हकीकती छापल्या जातात. दररोज सुमारे २ हजार माणसं हे वेब वर्तमानपत्रं वाचतात. कधी…