ब्रीटन. युरोपियन माथ्यावर खापर
सरतेशेवटी ५२ टक्के ब्रिटीश नागरिकांनी युरोपियन युनियनच्या बाहेर पडण्याच्या बाजूला आणि ४८ टक्के नागरिकांनी बाहेर न पडण्याच्या बाजूला मतदान केलं. जनतेचा निर्णय अमलात यायला सुमारे दोन वर्षाचा काळ लागेल. पंतप्रधान कॅमेरॉन यांच्या राजिनाम्यानंतर नवे पंतप्रधान ऑक्टोबरमधे सूत्रं हाती घेतील. नवे पंतप्रधान युरोपियन युनियनच्या काऊन्सीलमधे भाषण करतील, नोटीस देतील आणि नंतर युनियनच्या बाहेर पडण्याची कारवाई सुरु होईल. कारवाईची प्रक्रिया पूर्ण व्हायला दोन वर्षं लागतील. युरोपियन युनियन ही एक अपूर्ण राजकीय-आर्थिक व्यवस्था आहे. तिच्यात सुधारणेला वाव आहे. अस्मिता आटोक्यात ठेवून जागतीक प्रश्न…