मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव. भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं.
मॅक्समुल्लर ते वेलचेरू नारायण राव भारतीय प्राचीन साहित्याची भाषांतरं भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी भारतीय साहित्याच्या भाषांतराला सुरवात केली. भाषेचा इतिहास आणि भाषेची रचना या शास्त्राचा अभ्यासक विल्यम जोन्सनं १७९४ मधे मनुस्मृतीचं इंग्रजीत भाषांतर केलं. त्यानंतर मॅक्समुल्लरनं the sacred books of the east या मालिकेत भारतीय ग्रंथांचं भाषांतर प्रकाशित करायला सुरवात केली. त्याची ५० भाषांतरं प्रसिद्ध झाली. त्यातली ३८ भाषांतरं संस्कृत ग्रंथांची आहेत. मॅक्समुल्लरनं ४९ ग्रंथांची सूची लिहिली. सूची लिहिणं हा प्रकार त्या काळात प्रचलीत नव्हता. मॅक्समुल्लरनं संपादक प्रकाशक विंटरनिट्झकडं सूची ग्रंथ…