तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर.
तुर्कस्तान. निरंकुष सत्तेसाठी धर्माचा वापर. १५ जुलैचा सूर्य मावळल्यानंतर साडेसात वाजता इस्तंबूलच्या रस्त्यावर रणगाडे फिरू लागले, त्यांनी काही रस्ते अडवले. सात वाजून पन्नास मिनिटांनी हवाई दलाची लढाऊ विमानं आकाशात फिरू लागली.आठ वाजता पंतप्रधान यिलडिरीम यांनी जाहीर केलं की लष्करातली काही माणसं अनधिकृत कारवाई करत असून जनतेनं शांत रहावं. नऊ वाजता काही लष्करी अधिकाऱ्यांनी सेना प्रमुखाना ताब्यात घेतलं आणि अंकारामधे टीव्ही स्टेशनवर ताबा मिळवला. सव्वा नऊ वाजता टीव्हीवरच्या बातम्यांत निवेदकानं जाहीर केलं की लष्करानं मानवी अधिकार आणि लोकशाही स्थापनेसाठी सरकार बरखास्त…