अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.
अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश. अमेरिकेचं सैन्य जगात सर्वात प्रभावी. जगातल्या हुकूमशाह्या, कम्युनिष्ट राजवटी, अमानवी कृत्यं करणाऱ्या राजवटी इत्यादी नष्ट करणं हा अमेरिकेचा आवडता उद्योग. स्वतःच नेमून घेतलेले जगाचे पोलिस. अशी ही अमेरिका अध्यक्षीय पद्धतीनं चालते. मतदार थेट मतदान करून अध्यक्षाला निवडतात. अध्यक्षाचं स्वतःचं मंत्रीमंडळ असतं. देशाच्या सेनेचा तो कमांडर इन चीफ असतो. तो संसदेसमोर जात नाही, तो संसदेला जबाबदार नसतो. त्यानं घेतलेले निर्णय संसद तपासत असते, त्याचे निर्णय मंजूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानं मांडलेलं बजेट नामंजूर करून…