ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले
माध्यमांचं भाकित, अंदाज, अभ्यास खोटे ठरले. डोनल्ड ट्रंप निवडून येणार नाहीत असं अमेरिकन आणि युरोपिय माध्यमांना वाटत होतं. लॉर्ड मेधनाद देसाई या बहुदा एकट्याच पत्रकारानं ट्रंप निवडून येतील असं भाकित केलं होतं. ट्रंपना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा दोन लाख मतं कमी पडली हे खरं. ते इलेक्टोरल व्होट या चमत्कारिक अमेरिकन निवडणुक पद्धतीमुळं प्रेसिडेंट झाले हेही खरं. परंतू इतकी मतं ट्रंप यांना मिळतील असं कोणीही माध्यमातलं माणूस माणूस म्हणत नव्हतं. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकतील असं माध्यमं म्हणत…