अमेरिकन सरकार उध्वस्थ होतं तेव्हां आपोआप होणारा संकटकालीन प्रेसिडेंट
कल्पना करा. दहशतवाद्यांनी अमेरिकेत संसदेवर हल्ला केलाय. त्यात राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, सर्व संसद सदस्य मारले गेलेत. अमेरिकन राज्यघटनेत प्रेसिडेंटनं देशाला उद्देशून स्टेट ऑफ द युनियन भाषणं केव्हाही आणि कितीही करावीत अशी तरतूद आहे. सामान्यतः प्रत्येक प्रेसिडेंट वर्षातून एकदा असं भाषण करत असतो. उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य, मंत्रीमंडळ अशी सगळी माणसं या भाषणाला हजर असतात.१९६० च्या दशकात जगावर अणुयुद्धाचं सावट पसरलं होतं तेव्हां अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो या भीतीनं अमेरिकन सरकारनं एक संकटकालीन तरतूद केली. स्टेट ऑफ द युनियन भाषण…