निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी
निवडणुका, उमेदवार, पक्ष, विचारसरणी गेल्या काही दिवसांतली घटनाचित्रं मुंबईतल्या दादर भागातला एक रस्ता. दुकानांच्या रांगेत एक टीव्ही सेट विकणारं दुकान. अनेक टीव्हीचे सेट्स, त्यावर निवडणूक निकालावर दोन तीन वाहिन्यांनी चालवलेले कार्यक्रम. पडद्यावर चारही बाजूंना पक्षांना मिळालेल्या जागांचे चौकटींत मांडलेले आकडे. मधल्या छोट्याशा भागात अँकर आणि चर्चक. चर्चकांमधे पत्रकार आणि पक्षांचे प्रवक्ते. विष्लेषणं चाललेली असतात. मधे मधे विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, पेढे भरवणं इत्यादी दिसतं. फूटपाथवरची माणसं टीव्हीवरचे कार्यक्रम दाटीवाटीनं पहात उभे असतात. मतदारसंघाचा निकाल लागला की जमलेले प्रेक्षक टाळ्या वाजवत, चुकचुकत,…