मंडेलांच्या सोबत २६ वर्षे तुरुंगावास भोगलेला संयमी लढवय्या
दक्षिण आफ्रिकेतले स्वातंत्र्य सैनिक अहमद कथ्राडा परवाच्या २८ मार्चला वयाच्या ८७ व्या वर्षी वारले. नेल्सन मंडेला यांच्यासोबत ते २६ वर्षं तुरुंगात होते. द.आफ्रिकेमधे कथ्राडा यांना नेल्सन मंडेला यांच्या बरोबरीचं स्थान आहे. १९४८ साली नॅशनल पार्टीनं दक्षिण आफ्रिकेमधे वंशद्वेषाचं धोरण अवलंबलं, काळ्यांना स्वातंत्र्य आणि अधिकार नाकारणारे वर्णद्वेषी कायदे केले. सरकारच्या वंशद्वेषी धोरणाविरोधात नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस स्थापन करून लढा सुरु केला. त्या लढ्यात अहमद कथ्राडा मंडेला यांच्यासोबत होते. एका अगदी साध्या तंबूमधे त्यांचं शव दफनापूर्वी ठेवण्यात आलं होतं. कोणताही…