सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.
दहशतवादाचा न संपणारा छळवाद छत्तीसगड राज्यात सुकमा गावात माओवादींनी केलेल्या गनिमी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले. सीआरपीएफचे जवान दुपारी एकत्र जेवत होते. अशा रीतीनं इतक्या जवानांनी एकत्र असणं रणनीतीमधे बसत नाही. सुमारे ३०० माओवाद्यांनी हल्ला केला. आदिवासींना पुढं ठेवून हल्ला करण्यात आला. अचानकपण, माओवादी कोण आणि निष्पाप आदिवासी कोण ते न कळणं, निष्पापांची ढाल या तीन घटकांमुळं सीआरपीला प्रतिकार करण्यात अडचणी आल्या. छत्तीसगडमधे सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलाचे १५ हजारपेक्षा जास्त सैनिक माओवाद्यांचा सामना करत आहेत. छत्तीसगड राज्याचे पोलिस…