कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.
कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व. केरळात कोचीमधे एक द्विवार्षिक प्रदर्शन नुकतंच पार पडलं. त्यात निर्वासित, स्थलांतरीत या विषयावर अनेक चित्रं, कविता, इन्सॉलेशन्स मांडली होती. ।। समाजांना, देशांना सरहद्दी असतात. सरहद्दी लवचीक असतात, बाहेरच्या बाजूला त्या ताणल्या जाऊ शकतात. सरहद्दी सच्छिद्र असतात. नागरीक छिद्रातून बाहेर जाऊ शकतात, आत येऊ शकतात. एके काळी साम्राज्यं असत, त्यांना सरहद्दी असत. सम्राट या सरहद्दी ओलाडून दुसऱ्या प्रदेशात घुसत. कोणाच्या लेखी ते आक्रमण असे तर कोणाच्या लेखी साम्राज्यविस्तार. साम्राज्य विलयाला गेल्यानंतर देश तयार झाले. देशांना सरहद्दी असतात….