खुशवंत सिंग,गाजले पण त्यांना कुणी फारसं गंभीरपणानं घेतलं नाही.
खुशवंत सिंग यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या, काही कथा लिहिल्या. परंतू ते लेखक मानले जात नाहीत. शिख धर्माच्या इतिहासावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं. परंतू ते अभ्यासक, संशोधक मानले जात नाहीत. काही काळ ते पेंग्विन प्रकाशनाचे मानद सल्लागार संपादक होते. लेखकांची हस्तिलिखितं किंवा मूळ लिखितं वाचल्याचं दिसत नाही. वीकलीमधला त्यांचा काळ हाच त्यांचा संपादकपणाचा खरा काळ. फक्त नऊ वर्ष त्यांनी संपादन केलं असलं तरी ती कामगिरीसुद्धा भारतीय पत्रकारीत एक मैलाचा दगड असल्यागत आहे. ।। टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीत चवथ्या मजल्यावर ‘…